Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: भाजप नेते विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. ऐश्वर्या राय रोज मासे खाते.
त्यामुळे तिचे डोळे आणि त्वचा सुंदर आहे. मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकणी दिसायला लागतात, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गावित यांनी या वयात असं बोललं नाही पाहिजे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
Vijay Kumar Gavit is a senior leader – Sanjay Shirsat
संजय शिरसाट म्हणाले (Sanjay Shirsat), “विजय कुमार गावित एक ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने या वयात असं बोलायला नाही पाहिजे.
आंबे खाल्ल्याने पोरं होतात, असं अनेक लोक म्हणतात. मात्र, असं खरंच होतं का? गावित म्हणतात मासे खाल्ल्याने डोळे आणि त्वचा चांगली होते. खरंच जर असं होत असेल तर हा संशोधनाचा विषय आहे.
विजय कुमार गावित एक डॉक्टर आहे. त्यांनी मस्करीमध्ये हे विधान केलं असेल. मात्र, ते एक लोकप्रतिनिधी आहे हे त्यांनी कायम लक्षात ठेवलं पाहिजे.
त्यामुळं त्यांनी असं बोलायला नाही पाहिजे. तुम्ही मजा-मस्करी म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य करतात. परंतु लोक याला गांभीर्याने घेतात.”
दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यात आलं होतं. यावेळी बोलत असताना विजय कुमार गावित यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
ते म्हणाले, “नियमित मासे खाल्ल्याने आपल्याला दोन फायदे मिळतात. नियमित मासे खाल्ल्याने डोळ्यांचे सौंदर्य वाढते. त्याचबरोबर नियमित माशांचे सेवन केल्याने बाईमाणूस चिकना दिसू शकतो.
ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही देखील दररोज माशाचे सेवन केल्याने तुमचे डोळे तिच्यासारखे सुंदर आणि आकर्षक होऊ शकतात.”
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | “…अन्यथा अजित पवारांच्या सभेत राडा करू”; पवारांच्या सभेविरोधात मनसे आक्रमक
- Deepali Sayed | कोणी व्हील चेअर मागवा रे; दिपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं
- Bacchu Kadu | “… तर आम्ही सरकारच्या विरोधात उभं राहू”; बच्चू कडूंची संतप्त प्रतिक्रिया
- Sanjay Shirsat | संजय राऊत निवडणूक लढवणार याचा आम्हाला आनंद – संजय शिरसाट
- Rohit Pawar | तलाठी भरतीत काही काळंबेरं आहे? रोहित पवारांचा राज्य सरकारला खडा सवाल