Bacchu Kadu | अमरावती: आज राज्यामध्ये तलाठी भरतीची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सकाळी 09 ते 11 दरम्यान ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
मात्र, ऐनवेळी सर्व्हर डाऊन झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या घटनेनंतर प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी त्यांच्यासोबत या विषयावर चर्चा करणार असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
Action should be taken against the company causing confusion – Bacchu Kadu
बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी तलाठी परीक्षेदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे.
परीक्षेदरम्यान झालेल्या गोंधळाबाबत मी त्यांच्याशी बोलणार आहे. त्याचबरोबर ज्या कंपनीमुळे ही समस्या निर्माण झाली आहे त्या कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे.
याबाबतीत सरकारने जर ठोस कारवाई केली नाही तर आम्ही सरकारच्या विरोधात उभं राहू. विद्यार्थ्यांकडून कोणत्याही परीक्षेसाठी वर्षाकाठी फक्त 1000 रुपये फी घ्यावी.”
दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्विट रोहित पवार म्हणाले, “तलाठी भरतीसाठी हजार रुपये शुल्क वसुली करुनही संबंधित कंपनीला परीक्षा सुरळीत घेता येत नाही.
कधी पेपरफुटी तर कधी सर्व्हर डाऊन… ही अडथळ्यांची शर्यत परिक्षार्थ्यांना पार पाडावी लागतेय.. सकाळी ८ वाजता रजिस्ट्रेशन सुरु होणं अपेक्षित असताना सर्व्हर डाऊन झाल्याने संपूर्ण राज्यातील परीक्षा खोळंबलीय.. या सरकारला काही #SERIOUSNESS आहे की नाही? की यात काही काळंबेरं आहे?”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Shirsat | संजय राऊत निवडणूक लढवणार याचा आम्हाला आनंद – संजय शिरसाट
- Rohit Pawar | तलाठी भरतीत काही काळंबेरं आहे? रोहित पवारांचा राज्य सरकारला खडा सवाल
- Nitesh Rane | “संजय राऊतांची लायकी…”; नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात
- Eknath Shinde | काँग्रेसचा मोठा गट लवकरच महायुतीत सामील होणार; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
- Chandrakant Khaire | महाराष्ट्रात भाजपनं दंगली घडवल्या – चंद्रकांत खैरे