Share

Sanjay Shirsat | संजय राऊत निवडणूक लढवणार याचा आम्हाला आनंद – संजय शिरसाट

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या मुद्द्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं सांगितलं तर मी निवडणूक लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट … Read more

Published On: 

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळाली आहे. या माहितीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

या मुद्द्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षानं सांगितलं तर मी निवडणूक लढवणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut is a crazy man – Sanjay Shirsat

प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “संजय राऊत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर ती आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.

मात्र संजय राऊत वेडा माणूस आहे. सकाळी प्रसार माध्यमांसमोर भुंकण्यासाठी ते काहीही मुद्दे घेऊन येतात. त्यांना एकदा निवडणूक लढू द्या, म्हणजे त्यांना त्यांची औकात कळेल. यामध्ये संजय राऊत यांचा डिपॉझिट जाऊ नये म्हणजे झालं.”

दरम्यान, या प्रकरणावरून भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी देखील संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “पक्षांना जर आदेश दिला तर मी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणुका लढेल, असं संजय राजाराम राऊत यांनी सांगितलं आहे.

मात्र, संजय राऊत यांची लायकी सरपंचाच्या निवडणुकीची आहे. त्यांनी आधी सरपंचाची निवडणूक लढवावी आणि मग पुढे जावं. संजय राऊत स्वतःच्या वार्डामध्ये आपल्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणू शकला नाही.

ज्या वार्डात संजय राऊत यांचं घर आहे. त्या वॉर्डाचा नगरसेवक काँग्रेसचा आहे. संजय राजाराम राऊत यांना जर खरंच लोकसभा निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये यावं आणि मग निवडणूक लढवावी.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही