Sanjay Raut | लोकसभा निवडणुका लढवणार? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं

Sanjay Raut | मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आगामी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटासह महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरू केली असल्याचं देखील बोललं जात आहे.

या प्रकरणावर आता स्वतः संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने आदेश दिला तर मी लोकसभा निवडणूक लढू शकतो, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

We can do anything if the party orders us – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “पक्षाने आदेश दिला तर आम्ही तुरुंगात जातो. पक्षाने आम्हाला आदेश दिला तर आम्ही काहीही करू शकतो.

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत लढलेले लोक आहोत. पक्षाची गरज, पक्षाचा आदेश आणि पक्षप्रमुखांचा आदेश जो असेल तो मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत.

पक्षाने आदेश दिला तर मी निवडणुका देखील लढू शकतो. ईशान्य मुंबईत संजय राऊत सोडा, आमच्या पक्षातील साधा नेता जरी उभा राहिला तरी तो निवडून येईल.

ईशान्य मुंबई हा शिवसेना म्हणजेच ठाकरे गटाचा बालेकिल्ला आहे. ईशान्य मुंबईत शिवसेनेच्या मदतीने भारतीय जनता पक्षाचे खासदार निवडून आलेले आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत आम्ही आमचा साधा कार्यकर्ता पदाधिकारी जरी उभा केला तरी त्याचाच विजय होईल.”

दरम्यान, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जर 2024 लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असेल. यापूर्वी संजय राऊत चार वेळा राज्यसभेवर निवडून आले आहे.

तर ते आता आगामी लोकसभा निवडणूक ईशान्य मुंबई मतदार संघातून लढवणार असल्याचं बोललं जात आहे. या निवडणुकीमध्ये ईशान्य  मुंबई भाजपचे मनोज कोटक आणि संजय राऊत आमने-सामने आलेले दिसतील.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.