Share

Eknath Shinde | “ऐश्वर्या राय सारखे रोज मासे खा अन्…”; शिंदे गटातील नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

🕒 1 min readEknath Shinde | धुळे: राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसतात. यामध्ये बहुतांश वेळा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. अशाच शिंदे गटाचे नेते विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांनी मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ऐश्वर्या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Eknath Shinde | धुळे: राज्याच्या राजकीय वर्तुळात दररोज काहीतरी नवीन घडामोडी घडताना दिसतात. यामध्ये बहुतांश वेळा विरोधक आणि सत्ताधारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात.

अशाच शिंदे गटाचे नेते विजय कुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांनी मोठं आणि वादग्रस्त विधान केलं आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) हिच्याबद्दल त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ऐश्वर्या राय मासे खायची म्हणून तिची त्वचा आणि डोळे सुंदर आहे, असं विजय कुमार गावित यांनी म्हटलं आहे.

Aishwarya Rai used to eat fish every day – Vijay Kumar Gavit

विजय कुमार गावित म्हणाले, “मासे खाल्ल्याने दोन फायदे मिळतात. मासे खाल्ल्यावर बाईमाणूस चिकणा दिसू शकतो. त्याचबरोबर नियमित मासे खाल्ल्याने डोळ्याचे सौंदर्य वाढते.

ऐश्वर्या राय समुद्राच्या किनारी राहणारी आहे. ती बेंगलोरची आहे. ऐश्वर्या राय दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे एवढे सुंदर आहे. तुम्ही देखील दररोज मासे खाल्ले तर तुमचे डोळे देखील तिच्यासारखे सुंदर होऊ शकतात. माशांमध्ये एक प्रकारचं ऑइल असतं. त्यामुळे डोळे आणि त्वचा चांगली राहते.”

दरम्यान, धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छीमार बांधवांना मासेमारीचं साहित्य वाटप करण्यात आलं आहे. कार्यक्रमाला आदिवासी मंत्री विजय कुमार गावित देखील उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये बोलत असताना विजयकुमार गावित यांनी हे मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!