Sanjay Shirsat | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस नेते आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी खळबजनक वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रातील मुख्य खुर्ची बदलणार आहे. राज्यात आमचे सरकार येईल, असं मी म्हणत नाही. मात्र, सप्टेंबर महिन्यात राज्यातील सत्ता बदल होणार आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत. या पदावर असणाऱ्याला विरोधात बोलावं लागतं म्हणून त्यांनी हे विधान केलं असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
The government is working hard – Sanjay Shirsat
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “एक महिन्यात सरकार पडेल, दोन महिन्यात सरकार पडेल, चार महिन्यात सरकार पडेल, असं बोललं जात होतं.
मात्र, त्याचं काय झालं? खळबळजनक विधान करून फक्त चर्चेत येण्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केलं आहे. ते सध्या विधानसभा विरोधी पक्ष नेते आहे. या पदावर बसलेल्या व्यक्तीला विरोधात बोलावं लागतं. म्हणून त्यांनी ही भाषा वापरली आहे.
मात्र, राजकारणात ही भाषा पहिल्यांदा वापरली जात आहे का? सप्टेंबर महिन्यात सरकार पडेल असं विरोधक म्हणत आहे. मात्र, तसं काहीच होणार नाही. सरकार मजबुतीनं काम करत आहे.
दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कधीच एकत्र दिसत नाही.
ज्या ठिकाणी मुख्यमंत्री उपस्थित असतात त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री नसतात. तर कधी पुण्याचे उपमुख्यमंत्री नसतात तर कधी नागपूरचे. सरकारचं हे सर्व नाटक जनता बघत आहे.
येत्या पंधरा-वीस दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झालेला दिसणार आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील सत्ता बदल होणार आहे आणि याची सुरुवात मुख्य खुर्ची पासून होणार आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणी जन्माला येत नाही – राज ठाकरे
- Ambadas Danve | “आधी अजित पवारांना पिसिंग-पिसिंग म्हणायचे आता किसिंग सुरू…”; अंबादास दानवेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला
- Chandrashekhar Bawankule | विरोधकांचं ‘ते’ स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही; चंद्रशेखर बावनकुळे बरसले
- Chandrashekhar Bawankule | सामना वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार – चंद्रशेखर बावनकुळे
- Ashish Shelar | ठाकरे गटाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे? आशिष शेलारांचा खडा सवाल