Chandrashekhar Bawankule | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून खोचक टीका केली आहे.
यानंतर भारतीय जनता पक्ष आक्रमक झाल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सामना अग्रलेखाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांची चिडचिड व्यक्त केली आहे. सत्ता गेल्यामुळं उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांना जे काही बोलायचं असतं, ते उद्धव ठाकरे संजय राऊत (Sanjay Raut) आणि सामनाच्या माध्यमातून बोलतात.
आज सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे ती टीका नसून उद्धव ठाकरे यांची चिडचिड आहे. सत्ता गेल्यामुळे त्यांची ही चिडचिड होते.
सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे बावचळले आहे. त्याचबरोबर त्यांचं डोकं काम करणं बंद झालं आहे. त्यांचा पक्ष फुटला आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत येण्याची पुन्हा संधी नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे पक्षाचं चिन्ह आणि नाव उरलेलं नाही.”
BJP leaders may protest in Mumbai against Saamna newspaper – Chandrashekhar Bawankule
पुढे बोलताना ते (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून त्यांनी जी चूक केली आहे ती आता त्यांच्या लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे ते सामना अग्रलेखाच्या माध्यमातून अशा प्रकारची टीका करत आहे.
त्यामुळं सामना या वृत्तपत्राची आम्ही तक्रार करणार आहोत. कारण वृत्तपत्राला देखील लिहिण्याची आणि बोलण्याची एक लिमिट आहे. भाजप नेते सामना वृत्तपत्राच्या विरोधात मुंबईमध्ये आंदोलन देखील करू शकतात.
कारण सामना ज्या पद्धतीने आग ओकत आहे, ती आग आता आम्हाला थांबवावी लागणार आहे. त्यासाठी लवकरच आम्हाला आमची भूमिका स्पष्ट करावी.”
दरम्यान, सामना अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. “देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले.
त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीच सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते.
‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस, सांभाळा”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ashish Shelar | ठाकरे गटाकडे बोगस मतदार नोंदणीची मशीन आहे? आशिष शेलारांचा खडा सवाल
- Sanjay Raut | अजून खरी मिरची झोंबायची बाकी; संजय राऊतांचा भाजपला इशारा
- Vijay Wadettiwar | महाराष्ट्रातील मुख्य खुर्ची बदलणार? विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान
- Chandrashekhar Bawankule | संभु जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Nitesh Rane | नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात; म्हणाले, “झकाणझुक्या…”