🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई: उद्धव ठाकरे गटानं आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सामना अग्रलेखाच्या माध्यमातून खोचक टीका केली आहे.
‘उप’ झाल्याच्या वैफल्यात देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता संपली असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी ठाकरे गटावर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली नाही. देवेंद्र फडणवीस एक सद्गुरुस्त आहे. त्याचबरोबर ते एक संस्कारी गृहस्थ आहे. त्यांचा जुन्या भारतीय जनता पक्षाशी संबंध आहे.
त्यांना आम्ही फक्त आरसा दाखवला आहे. आमच्याशी बेईमानी केली म्हणून आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला, असं देवेंद्र फडणवीस सांगतात. त्यामुळं आम्ही त्यांना आरसा दाखवला आहे.
खरी बेईमानी आम्ही नाही तुम्ही केली आहे. तुम्ही जो डुप्लिकेट माल (शिंदे गट) घेऊन बसला आहात ती बेईमानी आहे. 2014 आणि 2019 मध्ये त्यांनीच आमच्यासोबत बेईमानी केली आहे.”
BJP broke their word – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “आम्ही फक्त देवेंद्र फडणवीस यांना खरं काय ते सांगितलं आहे. यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना मिरची लागण्याची गरज नव्हती. अजून त्यांना खरी मिरची झोंबायची बाकी आहे.
2014 मध्ये कोणी युती तोडली याबद्दल एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये भारतीय जनता पक्षांनं आम्हाला मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला होता.
मात्र, त्यांनी त्यांचा शब्द मोडला. त्यामुळं बेईमान आम्ही नाही तर ते आहेत. देवेंद्र फडणवीस अपराधी आहे, असं मी म्हणत नाही. परंतु त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचा शब्द पाळलेला नाही.”
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत ठाकरे गटावर टीका केली आहे. ते म्हणाले, “किंचित सेनेचे पक्षप्रमुख आणि वैफल्यग्रस्त उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून बोरूबहाद्दर संजय राऊत यांनी आज सामनातून देवेंद्र फडणवीसजींच्या विरोधात गरळ ओकली.
2019 साली ज्यांनी भाजपसोबत गद्दारी केली, स्वतःच्या खुर्चीसाठी वडिलांच्या हिंदुत्ववादी धोरणाला पायदळी तुडवलं. ते उद्धव ठाकरे खरे गद्दार आहेत, हे महाराष्ट्रातील जनतेनं ओळखलंय.
उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराची सत्ता उलथून देवेंद्रजी पुन्हा एकदा सत्तेत आले. हे सत्य त्यांना अजूनही पचत नाही म्हणून आजही ते ग्लानीत आहेत. ‘सुंभ जळाला तरी पिळ कायम’ या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्या अहंकाराचा पिळ कायम आहे.
म्हणूनच अहंकाराच्या नशेत झिंगून ते देवेंद्रजींवर टीका करत आहेत. पण तुमचा हा जळफळाट फार काळ राहणार नाही, कारण येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या उरल्या सुरल्या अहंकाराची लंका जाळून टाकेल. तोवर जनतेच्या पैशातून बांधलेल्या मातोश्री- २ मध्ये तुम्ही आणि बोरूबहाद्दर राऊत टोमणे मारत बसा.”
महत्वाच्या बातम्या
- Vijay Wadettiwar | महाराष्ट्रातील मुख्य खुर्ची बदलणार? विजय वडेट्टीवारांचं खळबळजनक विधान
- Chandrashekhar Bawankule | संभु जळाला तरी पिळ कायम; चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Nitesh Rane | नितेश राणेंचा संजय राऊतांवर घणाघात; म्हणाले, “झकाणझुक्या…”
- Devendra Fadnavis | फडणवीसांचं सत्य तुमच्या घरबश्याला झोबलं; ठाकरे गटाच्या टीकेला भाजपचं प्रत्युत्तर
- Uddhav Thackeray | “देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अर्धग्लानी…”; ठाकरे गटाचा फडणवीसांवर हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










