🕒 1 min read
Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून खोचक टीका केली आहे.
‘उप’ झाल्याच्या वैफल्यात देवेंद्र फडणवीस यांची संवेदनशीलता संपली असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेला भाजपाने प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपचे आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Devendraji’s words were enough to revive you – Ram Kadam
ट्विट करत राम कदम म्हणाले, “आदरणीय देवेंद्रजीवर टीका करनं तुमची उरल सुरल अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय आवश्यकता आहे.
हे महाराष्ट्र जाणतो.. खरं मूळ.. फेसबुक सरकार आणी फेस टू फेस सरकार … हे देवेंद्रजीच सत्य वाक्य तुम्हाला अन तुमच्या घरबश्याला झोबलं.. बंद दाराआड … हा देवेंद्रजी चा शब्द तर भर नशेत तुमची जिरवणारा होता.
असो वसुली बंद झाली महापालिका कशी तुम्ही लुटली ते लोकांसमोर पुरव्यानिशी येऊ लागले त्याचा परिणाम .. वैफल्यातुन झालेला हा जळफळाट देशी घेऊन व्यक्त झालेला दिसतो आहे.
तुम्हांला खुले आव्हान.. हिम्मत असेल तर देवेंद्रजी जे बोलले त्यात काय चुकीचे होते ते सांगा ? आहे हिम्मत ?
आदरणीय @Dev_Fadnavis देवेंद्रजी वर टीका करनं
तुमची उरल सुरल अस्तित्व टिकवण्यासाठी राजकीय आवश्यकता आहे..
हे महाराष्ट्र जाणतो..
खरं मूळ..
फेसबुक सरकार आणी फेस टू फेस सरकार … हे देवेंद्रजीच सत्य वाक्य तुम्हाला अन तुमच्या घरबश्याला झोबलं..
बंद दाराआड …
हा देवेंद्रजी… https://t.co/SMEkrsTWr3
— Ram Kadam (@ramkadam) August 19, 2023
दरम्यान, ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. “एक आपले मुख्यमंत्री, ते सहसा झोपत नाहीत दुसरे उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्थग्लानी अवस्थेत आहेत. “मी पुन्हा येईन असे म्हणालो होतो.
बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,” असे श्री. फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे.
गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे. फणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले.
आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. मी येणारच होतो, पण काही लोकांनी बेइमानी केली म्हणून मध्येच लटकलो. पण तरीही आलो. या त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही.
आता 2019 साली बेइमानी कोणी केली, हे महाराष्ट्र जाणतो. फडणवीस व त्यांचा पक्ष अर्धग्लानीत असला तरी महाराष्ट्राची जनता झोपेत नाही”, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “देवेंद्र फडणवीस यांची अवस्था अर्धग्लानी…”; ठाकरे गटाचा फडणवीसांवर हल्लाबोल
- Ghulam Nabi Azad | “हिंदू धर्म इस्लामापेक्षा पुरातन…”; गुलाम नबी आझाद यांचं खळबळजनक वक्तव्य
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ! ठाकरेंच्या बड्या नेत्यांनं केला शिंदे गटात प्रवेश
- Bacchu Kadu | अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल – बच्चू कडू
- Supriya Sule | राजकारणात मी कशासाठी आले? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










