Ghulam Nabi Azad | टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये आझाद यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. इस्लामापेक्षा हिंदू धर्म जुना आहे. आधी सर्व मुस्लिम हिंदू होते, असं गुलाब नवी आझाद यांनी म्हटलं आहे. आझाद यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Hinduism is older than Islam – Ghulam Nabi Azad
गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले, “काश्मीरमध्ये 600 वर्षांपूर्वी फक्त काश्मिरी पंडित होते. मात्र त्यानंतर अनेक लोक धर्मांतर करून मुस्लिम झाले आहे.
हिंदू धर्म इस्लाम पेक्षा पुरातन आहे. फक्त 10-20 मुस्लिम सैन्याचा भाग म्हणून भारतात आले होते. बाकी सर्व लोकांनी धर्म परिवर्तन केलेलं आहे. धर्माच्या नावावर लोकांनी मतदान करू नये. त्याचबरोबर राजकारणाला धर्मात मिसळू नये.”
पुढे बोलताना ते (Ghulam Nabi Azad) म्हणाले, “जो कमजोर असतो तो राजकारणामध्ये धर्माचा आधार घेतो. ज्यांचा स्वतःवर विश्वास आणि श्रद्धा आहे, तो कधीच धर्माचा आधार घेताना दिसणार नाही.
आम्ही बाहेरून आलेलो नाही. आमचा जन्म याच मातीमध्ये झाला आहे. त्याचबरोबर या मातीमध्येच आमची राख होणार आहे. आम्ही बाहेरून आलेलो आहोत, असं भाजप नेते म्हणतात. मात्र, आम्ही बाहेरून आलेलो नाही हे त्यांना कोणीतरी सांगावं.”
“हिंदू मुस्लिम दोन्हींचा अंत या मातीत होतो. मुस्लिमांचा अंत देखील या भूमीतच होतो. त्यांची हाडे आणि मांस भारतमातेचा भाग होतात. मग हिंदू-मुस्लिम हा वाद कशासाठी? हा वाद फक्त एक प्रकारचं राजकीय युद्ध आहे”, असही ते (Ghulam Nabi Azad) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत वाढ! ठाकरेंच्या बड्या नेत्यांनं केला शिंदे गटात प्रवेश
- Bacchu Kadu | अजित पवार मुख्यमंत्री झाले तर सरकारचं वाटोळं होईल – बच्चू कडू
- Supriya Sule | राजकारणात मी कशासाठी आले? सुप्रिया सुळेंनी स्पष्ट सांगितलं
- Chandrashekhar Bawankule | नरेंद्र मोदींचं नेतृत्व शरद पवार मान्य करतील – चंद्रशेखर बावनकुळे
- Aditya Thackeray | राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक – आदित्य ठाकरे