Aditya Thackeray | राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक – आदित्य ठाकरे

Aditya Thackeray | मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणूका रद्द करण्यात आल्या आहे. या निवडणुका अचानक रद्द केल्यामुळं ठाकरे गटानं राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री (Eknath Shinde) एक नंबरचे डरपोक आहे, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Senate elections have been canceled for no reason – Aditya Thackeray

पत्रकार परिषदेत बोलत असताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “एकनाथ शिंदे डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षात उडी मारली. नाही तर त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली असती.

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री एक नंबरचे डरपोक आहे. काहीच कारण नसताना सिनेट निवडणुका रद्द करण्यात आल्या आहे. नक्की असं काय घडलं? की ही निवडणूक स्थगित करण्यात आली.

निवडणूक रद्द करण्यासाठी झालेली बैठक कुठे झाली? किती वाजता झाली? कुणाच्या घरी झाली? या बैठकीला कोण कोण उपस्थित होतं? असे अनेक प्रश्न आम्हाला पडले आहे. मात्र, या प्रश्नांचे उत्तर कोणालाच माहीत नाही.”

पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “आज ही निवडणूक स्थगित झाली असेल तर पुढे ही निवडणूक कधी होईल? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री निवडणुकांना घाबरत आहे. भाजपनं आतापर्यंत दोन पक्ष फोडले आहे. एक परिवार फोडला आहे. त्यानंतर त्यांनी महाशक्ती स्थापन केली.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असलेलं सरकार त्यांनी स्थापन केलं. एवढं सगळं असून देखील त्यांनी मुंबई विद्यापीठाची निवडणूक रद्द केली आहे.”

“कदाचित लोकसभा निवडणूकमध्ये देखील ही घटना घडू शकते. सरकार निवडणुका जाहीर करतील आणि मग नंतर त्या स्थगित करतील. सिनेट काही यांचं सरकार पाडणार नव्हतं.

यांचं घटनाबाह्य सरकार आम्हीच पाडणार आहोत. सिनेट यांच्या सरकारला काहीच करणार नाही तरी देखील ते या निवडणुकांना एवढं का घाबरत आहे”, असही ते (Aditya Thackeray) यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.