Share

Bacchu Kadu | “छातीवर तलवार ठेवली तरी मंत्रिपद…”; बच्चू कडूंनी व्यक्त केली नाराजी

🕒 1 min readBacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांना वांद्रा येथील ताज लॉर्ड्स एंड या हॉटेलमध्ये डिनरसाठी सहकुटुंब बोलवलं आहे. मात्र, मंत्री पदाचा दर्जा असूनही आमदार बच्चू कडू यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून बच्चू कडू यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. … Read more

Published On: 

🕒 1 min read

Bacchu Kadu | टीम महाराष्ट्र देशा: आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राज्यातील सर्व मंत्र्यांना वांद्रा येथील ताज लॉर्ड्स एंड या हॉटेलमध्ये डिनरसाठी सहकुटुंब बोलवलं आहे.

मात्र, मंत्री पदाचा दर्जा असूनही आमदार बच्चू कडू यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावरून बच्चू कडू यांनी जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

If I get a ministerial offer, I will not accept it – Bacchu Kadu

प्रसार माध्यमांशी बोलत असताना आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फक्त कॅबिनेट मंत्र्यांना डिनरसाठी आमंत्रण दिलं आहे.

कदाचित मी कॅबिनेट मंत्री नसल्यामुळं मला या कार्यक्रमासाठी बोलावलं नसेल. मंत्री असणं आणि मंत्री पदाचा दर्जा असणं यामध्ये खूप फरक आहे.

परंतु आता मला मंत्रिपदाची ऑफर आली तर ती मी स्वीकारणार नाही. मंत्रीपदासाठी मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांना संधी देईल. आता माझ्या छातीवर तलवार ठेवली तरी मी मंत्री होणार नाही.”

दरम्यान, राज्य सरकारनं रातोरात मुंबई विद्यापीठ पदवीधर सिनेट निवडणुकांचा कार्यक्रम रद्द केला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे.

ते म्हणाले, “राज्य सरकारच्या मनामध्ये हरण्याची भीती आहे, म्हणून त्यांनी या निवडणुका रद्द केल्या. तुम्ही हरणार आहात म्हणून तुम्ही लोकसभा निवडणुका देखील रद्द करणार आहात का?

सिनेट निवडणुकांसाठी आम्ही पूर्णपणे तयार होतो. त्यामुळे या निवडणुका आम्ही जिंकू म्हणून राज्य सरकारनं त्या रद्द केल्या आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!