Share

Jitendra Awhad | “अरे पळकुट्या, नाव तर…”; जितेंद्र आव्हाडांचा धनंजय मुंडेंना अप्रत्यक्ष टोला

Jitendra Awhad | बीड: काल (17 ऑगस्ट) बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा पार पडली.

या सभेमध्ये बोलत असताना शरद पवार यांनी शिंदे फडणवीस आणि मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. मणिपूर हिंसाचार, कळवा रुग्णालयातील प्रकरण इत्यादी मुद्द्यांचा यामध्ये समावेश होता.

त्याचबरोबर यावेळी शरद पवार गटानं अजित पवार गटाला देखील धारेवर धरल्याचं दिसून आलं आहे. या सभेमध्ये शरद पवार गटानं  धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर निशाणा साधला आहे.

Dhananjay Munde’s supporters had put pictures of Sharad Pawar

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं आहे. शरद पवार गटानं या सभेमध्ये बोलत असताना धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता घणाघाती टीका केली आहे.

शरद पवार यांच्या सभेपूर्वी बीड शहरामध्ये धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी शरद पवारांचे फोटो लावले होते. ‘आशीर्वाद द्या’, असं या बॅनरवर नमूद करण्यात आलं होतं.

या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर खोचक टीका केली आहे. “अरे पळकुट्या, नाव तर लिहायचं”, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर टीकास्त्र चालवलं आहे.

दरम्यान, शरद पवार यांच्या वयावरून अजित पवारांनी (Ajit Pawar) त्यांच्यावर खोचक टीका केली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी काल भाष्य केलं.

ते म्हणाले, “आपल्याला भविष्याचा विचार करायचा असेल तर दुसरा नेता निवडायला हवा. कारण पवार साहेबांचं आता वय झालं आहे, असं अनेक लोक म्हणतात. त्या लोकांना माझं एकच सांगणं आहे की माझं वय जरी झालं असलं तरी तुम्ही माझं काम बघितलं आहे.”

महत्वाच्या बातम्या

Jitendra Awhad | बीड: काल (17 ऑगस्ट) बीड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now