राजेभाऊ मोगल । छत्रपती संभाजीनगर । Bhavana Gawali vs Kirit Somaiya : खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप करणारे छत्रपती संभाजीनगर येथील सी.ए. उपेंद्र मुळे यांच्या घरी भाजपा नेते किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) यांनी बुधवारी (ता.१६) भेट दिली. सोमय्या यांच्या या दौऱ्यात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे शहराला छावणीचे स्वरुप आले होते.
माजी खासदार किरीट सोमैय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मागील काही दिवसांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. मात्र, सोमैय्या अचानक शहरात येणार असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यामुळे अगोदरच सोमैय्या यांना केंद्र सरकारची सुरक्षा असताना पुन्हा शहर पोलीस दलातील जवानांचा बंदोबस्त लावण्यात आला. त्यांच्या या दौऱ्यात केंद्रीय मंत्र्यांपेक्षा अधिक सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली.
जवळपास तीनशे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यात पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश होता. विमानतळ येथून हा ताफा थेट सीए मुळे यांच्या निवासस्थानी पोहोचला. तिथे देखील मोठा फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. परिसरातील पूर्ण रस्ता बंद करण्यात आला होता. सोमैय्या नेमके कशासाठी आले? हा प्रश्न निर्माण झाला होता. मुळे यांच्याशी भेट घेतल्यानंतर ते इतर ठिकाणी रवाना झाले.
खासदार गवळी यांनी आर्थिक व्यवहाराचे खोटे कागदपत्र तयार केल्याचा आरोप सीए मुळे यांनी केला होता. त्यानंतर सोमैय्या यांनी हा विषय उचलून धरत कारवाईची मागणी केली होती. दरम्यान, सीए मुळे यांच्या सासूंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे सांत्वन करण्यासाठी सोमैय्या आले होते, असे उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
- Sharad Pawar | भाजप आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न – शरद पवार
- Narendra Modi | कॅगचा मोठा खुलासा! मोदी सरकारचे 7 घोटाळे केले उघड
- Jitendra Awhad | कुणी शरद पवारांना ऑफर देऊ शकतो, हा मोठा जोक – जितेंद्र आव्हाड
- Raj Thackeray – निर्धार मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे