Sharad Pawar | भाजप आणि मोदींविरोधात जनमत तयार करण्याचा आमचा प्रयत्न – शरद पवार
Sharad Pawar | छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या वारंवार बैठकी होताना दिसत आहे.
या बैठकीनंतर शरद पवार देखील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. त्यानंतर शरद पवारांनी या चर्चांना पूर्णविराम दिला. मी भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका शरद पवार यांनी मांडली होती. त्यानंतर आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
We will hold two meetings against BJP – Sharad Pawar
पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “भारतीय जनता पक्षाची भूमिका फूट पाडणारी आणि समाजविरोधी आहे. समाजात तेढ कशी निर्माण करायची, हिचं भाजपची भूमिका आहे.
त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये अस्थिरता निर्माण केली आहे. त्यामुळं देशपातळीवर आम्ही भाजप विरोधात दोन सभा घेणार आहोत.
बिहार आणि कर्नाटकमध्ये या दोन सभा होतील. 1 सप्टेंबर रोजी इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये याबाबत पुढची रणनीती ठरवण्यात येणार आहे. आम्ही भाजप आणि मोदी सरकार विरोधात जनमत तयार करण्याचा प्रयत्न करणार आहोत.”
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून मी राज्यातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना सांगोला परिसरात सुमारे 1000 लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी माझी गाडी अडवली.
उद्या मी बीडमध्ये जाहीर सभा घेणार आहे. त्याचबरोबर पुणे, सातारा दौऱ्यावर असताना अनेक कार्यकर्ते मला भेटण्यासाठी आले होते.
दरम्यान, भाजपनं शरद पवारांना (Sharad Pawar) आपल्यासोबत येण्यासाठी ऑफर दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “शरद पवार यांची लोकसभेतील कारकीर्द किती आहे? त्यांना कोण ऑफर देऊ शकतं? शरद पवारांना कोणी ऑफर देऊ शकतो, हा या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे.
ज्यांना याबद्दल बोलायचं त्यांना बोलू द्या. कारण शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. मी भाजपसोबत जाणार नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Narendra Modi | कॅगचा मोठा खुलासा! मोदी सरकारचे 7 घोटाळे केले उघड
- Jitendra Awhad | कुणी शरद पवारांना ऑफर देऊ शकतो, हा मोठा जोक – जितेंद्र आव्हाड
- Raj Thackeray – निर्धार मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
- Raj Thackeray | “भुजबळांनी अजित दादांना जेलची अवस्था सांगितली म्हणून…”; राज ठाकरेंचा अजित पवारांवर घणाघात
- Sanjay Shirsat | “विजय वडेट्टीवार मोदींसोबत नाश्ता करायला…”; संजय शिरसाटांनी वडेट्टीवारांचे कान टोचले