Share

Sanjay Shirsat | “विजय वडेट्टीवार मोदींसोबत नाश्ता करायला…”; संजय शिरसाटांनी वडेट्टीवारांचे कान टोचले

🕒 1 min read Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना शरद पवारांना भाजपसोबत आणावं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते राज्याचे भावी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चा सुरू असताना विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठं विधान केलं आहे.

अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यांना शरद पवारांना भाजपसोबत आणावं लागेल असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Did Vijay Wadettiwar sit for breakfast with Narendra Modi? – Sanjay Shirsat

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं चुकीचं आहे.

त्यांना ही माहिती कोणी दिली? कशाच्या आधारावर ते हे वक्तव्य करत आहे. विजय वडेट्टीवार नरेंद्र मोदी यांच्यासोबत नाश्ता करायला बसले होते का? फक्त हेडलाईन व्हावी, म्हणून अशा प्रकारची विधानं केली जातात.

पुढे बोलताना ते म्हणाले, “सत्ताधाऱ्यांवर टीका केली की प्रसिद्धी मिळते असा आजकाल ट्रेंड सुरू आहे. म्हणून प्रत्येकजण सत्ताधाऱ्यांवर टीका करताना दिसत आहे. सध्या सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चांगलं काम करत आहे. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही. मात्र, विरोधक आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी अशा  प्रकारचे वक्तव्य करतात.”

कळवा येथील महानगरपालिका रुग्णालयामध्ये घडलेल्या घटनेवरून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर टीका केली होती.

त्यांच्या टिकेला उत्तर देत संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “आमचं आणि जनतेचे राजकीय आरोग्य बिघडलेलं नाही. मात्र त्यांचं राजकीय आरोग्य बिघडलेलं आहे.

म्हणून यांच्यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे दवाखाना काढलेला आहे. महाराष्ट्राला 24 तास काम करणारे मुख्यमंत्री मिळाले आहे. हे त्यांचं खरं दुखणं आहे.

आधीचे (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्री काहीच काम करत नव्हते. मात्र, आताचे मुख्यमंत्री (एकनाथ शिंदे) दिवस-रात्र काम करत असतात. त्यांना मुख्यमंत्र्यांची काम थांबवता येत नाही, म्हणून त्यांच्या डोक्यात अशा प्रकारच्या काही भन्नाट कल्पना येतात.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही