Eknath Shinde | मुंबई: अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत सामील झाल्यापासून ते राज्याचे आगामी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या चर्चांमुळे शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.
या सर्व चर्चांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केलं आहे. या विषयावर बोलत असताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना चांगलं सुनावलं आहे.
जनता माझ्या पाठीशी आहे. त्यामुळं विरोधकांनी कितीही बुद्धी लावली, तरी ते मला चेकमेट करू शकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Opponent is trying to checkmate me – Eknath Shinde
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून विरोधक मला चेकमेट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. परंतु, जनतेचा पाठिंबा कायम माझ्यासोबत आहे.
त्यामुळं विरोधकांनी कितीही आपली बुद्धी लावली तरी ते माझं काहीच करू शकत नाही. राजकारणामध्ये बुद्धिबळ खेळणं अत्यंत सोपं झालं आहे.
मात्र, या ठिकाणी स्वतःची छाप सोडणं खूप कठीण आहे. काही विरोधक घोड्याप्रमाणे अडीच घराचं राजकारण करतात. तर काही उंटाप्रमाणे तिरकी चाल चालवतात. मात्र, मला चेकमेट करायचं त्यांचं स्वप्न कधीच साकार होणार नाही.”
पुढे बोलताना ते (Eknath Shinde) म्हणाले, “गेल्या वर्षी आम्ही राज्याच्या राजकारणामध्ये मोठी क्रांती घडवून आणली होती. त्यानंतर आम्हाला राजकारणातले ग्रँड मास्टर म्हणतात.
परंतु, खरे ग्रँड मास्टर विश्वनाथ आनंद आहे. कारण विश्वनाथ आनंद यांनी एकाच वेळी 22 जणांना बुद्धिबळामध्ये हरवलं आहे. त्यामुळं खरंतर त्यांनी राजकारणामध्ये यायला हवं. कारण राजकारणामध्ये देखील एकाच वेळी अनेक विरोधकांचा मुकाबला करावा लागतो.”
दरम्यान, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुख्यमंत्री पदाबाबत एक खळबळजनक विधान केलं आहे.
ते म्हणाले, “राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून सुद्धा भाजपची परिस्थिती सुधारलेली नाही. त्यामुळं त्यांना लोकसभेतील आकडा वाढवण्यासाठी शरद पवारांची (Sharad Pawar) गरज आहे.
म्हणून नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांना एक अट घातली आहे. अजित पवारांना जर राज्याचं मुख्यमंत्रीपद हव असेल तर त्यांना शरद पवारांना आपल्यासोबत घेऊन यावं लागेल, असं नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळं अजित पवार शरद पवारांना भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरत आहे.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | महाविकास आघाडीत फूट पडणार? संजय राऊतांनी स्पष्टचं सांगितलं
- Sharad Ponkshe | “राहुल गांधी मूळचे खान…”; शरद पोक्षे यांचं खळबळजन विधान
- Uddhav Thackeray | “मिंधे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे…”; ठाकरे गटाची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
- Vijay Wadettiwar | शरद पवार भाजपसोबत आले तरच अजित पवार मुख्यमंत्री होणार – विजय वडेट्टीवार
- Rohit Pawar | रोहित पवारांच्या हाती खेकडा; शिंदे गटावर साधना निशाणा