Share

Sharad Ponkshe | “राहुल गांधी मूळचे खान…”; शरद पोक्षे यांचं खळबळजन विधान

Sharad Ponkshe | मालेगाव: काल (15 ऑगस्ट) देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीसह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचबरोबर भारतीय विचार मंच तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेते शरद पोंक्षे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती. तर या … Read more

Published On: 

Sharad Ponkshe | मालेगाव: काल (15 ऑगस्ट) देशात मोठ्या उत्साहात आणि आनंदात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरामध्ये तिरंगा रॅलीसह वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं.

त्याचबरोबर भारतीय विचार मंच तर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अभिनेते शरद पोंक्षे यांची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती.

तर या कार्यक्रमाला पालकमंत्री दादा भुसे देखील हजार होते. यावेळी बोलत असताना शरद पोंक्षे यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे.

Gandhi is not original Gandhi – Sharad Ponkshe

शरद पोंक्षे म्हणाले, “गांधी हे ओरिजनल गांधी नसून खान आहे. ते महात्मा गांधी यांचे वंशज नाही. ते फक्त त्यांच्या आडनावाचा फायदा घेताना दिसत आहे.

या लोकांना त्यांच्या आजीचा इतिहास माहित नाही. तर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल काय माहित असेल? एकतर ते गांधीही नाही आणि सावरकर देखील नाही. ते नेहमी माफी मागून आपलं काम करतात.

त्यांनी राफेल प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टात माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या विधानावर देखील हेच केलं होतं.”

दरम्यान, अभिनेते शरद पोंक्षे नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. सध्या ते ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकामुळे चर्चेत आहे. एकीकडे त्यांच्या या नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

तर दुसरीकडे या नाटकाला मोठ्या प्रमाणात विरोध देखील होत आहे. शरद पोंक्षे पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग सुरू करणार आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही