Share

Rohit Pawar | रोहित पवारांच्या हाती खेकडा; शिंदे गटावर साधना निशाणा

🕒 1 min read Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिली होती. त्यांच्या या विधानावरून रोहित पवार यांनी तानाजी सावंत (Tanaji … Read more

Published On: 

🕒 1 min read

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान रोहित पवारांनी शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे खोचक टीका केली आहे.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिली होती. त्यांच्या या विधानावरून रोहित पवार यांनी तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर टीका केली आहे.

रोहित पवारांनी सोशल मीडियावर हातात खेकडा घेऊन तानाजी सावंत यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मीडियावर हातात जिवंत खेकडा घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी तानाजी सावंत आणि शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “आपलं अपयश झाकण्यासाठी या बिचाऱ्याला उगीचच खूप बदनाम केलं… त्यामुळं याची खूप कीव येते.. आता पुढच्या अपयशाला कुणाला बदनाम केलं जातं हे बघूया!”

रोहित पवारांनी या ट्विटच्या माध्यमातून नाव न घेता तानाजी सावंत आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा टीका केली आहे.

Crabs are very itchy – Rohit Pawar

दरम्यान, रोहित पवार (Rohit Pawar) यांनी याआधी देखील तानाजी सावंत यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. “खेकड्याला खूप जास्त खाज असते. त्यामुळं खेकड्याला जेव्हा खायचं असतं तेव्हा त्याची खाज पूर्णपणे उतरावी लागते.

नाहीतर ती खाज आपल्याला येते. मात्र, खाज उतरवून जर खेकडा खाल्ला तर आपल्याला ती खाज येत नाही”, असं म्हणतं रोहित पवारांनी नाव न घेता तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला होता.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला खेकड्याची उपमा दिल्यानंतर विरोधक त्यांच्यावर सातत्यानं खेकड्यावरून टोमणे मारताना दिसले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही