Rohit Pawar | शरद पवार आणि अजित पवारांच्या भेटीवर रोहित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ही भाजपची रणनीती…”

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडल्यानंतर हे अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांच्या वारंवार बैठका होत आहे. शनिवारी संध्याकाळी त्यांची एक गुप्त बैठक पार पडली.

या बैठकीनंतर राज्यातील राजकीय घडामोडींनी वेग धरला आहे. त्याचबरोबर त्यांच्या या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

अशात शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही सगळी भारतीय जनता पक्षाची रणनीती असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

BJP seems to be creating confusion – Rohit Pawar

माध्यमांसोबत बोलत असताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी तब्बल दोन वेळा त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.

मात्र, एखाद्या बड्या नेत्याला आपली भूमिका सातत्यानं माध्यमांसमोर मांडावी लागत असेल तर ते काही योग्य नाही. त्यांनी एकदा दिलेली प्रतिक्रिया सर्वांनी स्वीकारायला हवी.

मला असं वाटतं की, सध्या भारतीय जनता पक्ष संभ्रम निर्माण करत आहे. ही सर्व भारतीय जनता पक्षाची रणनीती आहे. त्यामुळं ही लोक मुद्दाम या चर्चा घडवून आणत आहे. या चर्चांमुळे त्यांना फायदा होणार असल्याचं दिसत आहे.”

दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमात असल्याचं दिसत आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार गटानं त्यांना पाहिजे तसा विरोध केला नव्हता. त्यामुळं मला असं वाटतं की राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही.

राष्ट्रवादीचा एक गट दिसणारा आहे, तर दुसरा गट न दिसणारा आहे. शरद पवार अजित पवारांसोबत येऊन महायुतीला आणखीन मजबूत करणार असल्याचं दिसत आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.