Share

Bacchu Kadu | “…म्हणून मुख्यमंत्री शिंदे गावी गेले”; बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Bacchu Kadu | मुंबई: गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं उपचार घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या महाबळेश्वर जवळच्या गावी गेले आहे. शिवसेना ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद कधीही जाऊ शकतं  म्हणून ते आजारी पडले असल्याचं उद्धव ठाकरे … Read more

Published On: 

Bacchu Kadu | मुंबई: गेल्या आठवड्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आजारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं उपचार घेण्यासाठी आणि आराम करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या महाबळेश्वर जवळच्या गावी गेले आहे.

शिवसेना ठाकरे गटानं मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावर प्रश्न उपस्थित केला आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद कधीही जाऊ शकतं  म्हणून ते आजारी पडले असल्याचं उद्धव ठाकरे गटांनं म्हटलं आहे.

या मुद्द्यावर प्रहार आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खरंच आजारी आहे, म्हणून ते गावी गेले असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

Chief Minister Eknath Shinde is very ill – Bacchu Kadu

बच्चू कडू (Bacchu Kadu) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खूप आजारी आहे. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबाबत कोणतीही खोटी बातमी बाहेर आलेली नाही.

कारण आम्ही स्वतः त्यांची भेट घेतली आहे. आम्ही त्यांची भेट घेतली, त्यावेळी त्यांचा ताप 103 होता. धावपळ आणि सातत्यानं काम करत राहिल्यामुळं त्यांना हे आजारपण आलं आहे.

मात्र, त्यांच्या आजारपणामुळं नेतृत्व बदललं जाणार नाही. 2024 पर्यंत राज्याच्या राजकारणात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही, असा आमचा ठाम विश्वास आहे.

यावेळी बोलत असताना बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या  भेटीबद्दल देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संभ्रमात असल्याचं दिसून आलं आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादीमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही. राष्ट्रवादीचा एक गट दिसणारा आहे. तर दुसरा गट न दिसणारा आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शरद पवार गटानं त्यांना हवा तसा विरोध केलेला नाही.

अजित पवार गटाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये शरद पवारांचे फोटो दिसत आहे. त्याचबरोबर शरद पवार आणि अजित पवार यांच्या सातत्यानं बैठकी होत आहे. शरद पवार अजित पवारांसोबत येऊन महायुती आणखीन मजबूत करणार असल्याचं दिसून येत आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही