Aditya Thackeray | भाजपची उद्धव ठाकरे गटाला ऑफर? आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: शरद पवार आणि अजित पवार यांची शनिवारी गुप्त भेट झाली आहे. या बैठकीमध्ये अजित पवारांनी शरद पवारांना भाजपसोबत जाण्याची ऑफर दिली असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कधीही ऑफरच्या राजकारणाला महत्त्व देत नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

I never value the politics of offers – Aditya Thackeray

भाजपने तुम्हाला देखील ऑफर दिली आहे. परंतू, अजित पवार (Ajit Pawar) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यामुळे तुम्ही भाजपची ऑफर स्वीकारत नाही का?

या प्रश्नाचं उत्तर देत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “ऑफर्सच्या राजकारणाला मी कधीच महत्त्व देत नाही.

आम्हाला देशातून हुकूमशाही सरकारला हाकलून लावायचं आहे. सध्या देशाच्या राजकारणामध्ये एकीकडे प्रामाणिक, एकनिष्ठ तर दुसरीकडे भ्रष्टाचारी आणि स्वार्थी लोक आहे. त्यामुळं आता कुणाचं काय करायचं? हे जनताच ठरवेल.”

पुढे बोलताना ते (Aditya Thackeray) म्हणाले, “हुकूमशाही सरकारला पळवून लावण्यासाठी देशातील विरोधी पक्ष एकत्र आले आहे. ज्यांना देश वाचवायचा आहे ते सर्व एकत्र आले आहेत.

लवकरच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. आम्ही आमची भूमिका ‘सामना’च्या माध्यमातून स्पष्टपणे मांडलेली आहे.”

दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “शरद पवारांची एक टीम आधीच सत्ताधाऱ्यांकडे गेली आहे, हे मी आधी देखील सांगितलं होतं.

त्यानंतर त्यांची दुसरी टीम देखील लवकरच सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होईल. हे सगळे एकमेकांसोबत आहे. हे आजकाल नाही तर 2014 पासूनच घडत आहे. तुम्ही पहाटेच्या शपथविधी विसरला का? हे सगळं तेव्हापासूनच सुरू आहे.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.