Vijay Wadettiwar | गडचिरोली: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) राज्य सरकारमध्ये सामील झाल्यापासून त्यांच्यावर सातत्यानं टीका होताना दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आपल्या पक्षाशी गद्दारी करणारे नेते आता आपल्या नव्या मालकामागं कुत्र्यासारखे फिरत असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
A leader is a tamed parrot – Vijay Wadettiwar
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका करताना विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, “मी नेहमी स्पष्ट बोलतो. कारण मी कुणाला घाबरत नाही.
कालपर्यंत हे सर्व नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत होते. तेच नेते आता त्यांच्यासोबत जाऊन पोपटासारखे नमो नमोचा उदो उदो करत आहे.
आपल्या पक्षाशी गद्दारी करणारे नेते आपल्या नव्या मालकाच्या मागे कुत्र्यांसारखे फिरताना दिसत आहे. हे सर्व नेते म्हणजे पाळलेला पोपट आहे.
ते फक्त त्यांच्या मालकाचं गाणं गायचं काम करतात. या सर्व पोपटांचे पंख कापलेले आहे. शिंदे गट असो वा अजित पवार सगळे आता पोपट झाले आहे.”
पुढे बोलताना ते (Vijay Wadettiwar) म्हणाले, “काँग्रेस सत्तेत असताना घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 350 रुपये होती. मात्र, भाजप सरकारने ही किंमत 350 वरून 1100 रुपयांवर नेली.
त्याचबरोबर काँग्रेस सरकारमध्ये शेतकऱ्यांना 380 रुपयांमध्ये डीएपी आणि युरिया मिळायचा. हाच दर या सरकारमध्ये 1300 रुपये झाला आहे. पूर्वी एक गरीब व्यक्ती तीन हजार रुपयांमध्ये घर चालवायचा. मात्र, आता त्यांना सहा हजार रुपये देखील कमी पडतात.”
महत्वाच्या बातम्या
- Raj Thackeray | “अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीची जागा ‘चोर’डिया…”; राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य
- Sanjay Shirsat | रोहित पवार उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते झाले – संजय शिरसाट
- Keshav Upadhye | “हा म्हणजे टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार…”; केशव उपाध्येंची संजय राऊतांवर खोचक टीका
- Sharad Pawar | मला भाजपसोबत जाण्यास स्वारस्य वाटत नाही – शरद पवार
- Rohit Pawar | शिंदे गटातील आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक – रोहित पवार