Sharad Pawar | सांगोला: अजित पवार (Ajit Pawar) शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार देखील भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहे.
या चर्चा सुरू असताना शनिवारी संध्याकाळी अजित पवार आणि शरद पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा रंगल्या आहे.
याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी भाजपसोबत जाणार नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
I will not go with BJP – Sharad Pawar
प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, “भारतीय जनता पक्षासोबत जाण्यास मला कोणत्याही प्रकारचं स्वारस्य वाटत नाही. परंतु माझे काही शुभचिंतक आणि हितचिंतक आहे. ज्यांना वाटत आहे की मी भाजपसोबत जायला हवं.
हे हितचिंतक मला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, मी आधी देखील सांगितलं होतं आणि आज पुन्हा सांगतो की मी भाजपसोबत जाणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं राजकीय धोरण नाही.”
पुढे बोलताना ते (Sharad Pawar) म्हणाले, “आमच्यामधील काही लोकांनी वेगळी भूमिका बजावली आहे. ती लोक आम्हाला सोडून निघून गेली आहे. त्यानंतर काही शुभचिंतकांना वाटतं की आम्ही देखील भारतीय जनता पक्षामध्ये जावं.
त्यामुळे आमचे हे हितचिंतक आणि शुभचिंतक आमच्याशी चर्चा करत आहे. मात्र, आम्ही आमची भूमिका बदलणार नाही.”
यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. हितचिंतक आणि शुभचिंतक कोण? ही नावं शरद पवार यांनी घेतलेली नाही.
यावेळी बोलत असताना शरद पवार यांनी त्यांच्या आणि अजित पवारांच्या भेटीवर देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “राजकारणा पलीकडचं देखील आमचं नातं आहे.
काका पुतण्या एकमेकांना भेटू शकत नाही का? मला माझ्या कुटुंबातील लोकांना भेटायचं असेल? तर त्यात चुकीचं काहीच नाही. पवार कुटुंबातील मी एक वडील माणूस आहे. त्यामुळं आम्ही एकमेकांना भेटू शकतो”, असही ते (Sharad Pawar) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | शिंदे गटातील आमदार ठाकरे गटात जाण्यास उत्सुक – रोहित पवार
- Rohit Pawar | “मुख्यमंत्री साहेब अनेक विद्यार्थी आस लावून…”; विद्यार्थ्यांच्या समस्येवर रोहित पवारांची CM शिंदेंना विनंती
- Sharad Pawar | महाविकास आघाडीत एकी आहे, संभ्रम निर्माण करू नका – शरद पवार
- Sanjay Raut | “राज्याचा कारभार सध्या वेड्यांच्या हातात…”; संजय राऊत यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका
- Prithviraj Chavan | शरद पवारांना भाजपकडून मोठ्या ऑफर्स; पृथ्वीराज चव्हाण यांचा खळबळजनक खुलासा