Share

Rohit Pawar | “मुख्यमंत्री साहेब अनेक विद्यार्थी आस लावून…”; विद्यार्थ्यांच्या समस्येवर रोहित पवारांची CM शिंदेंना विनंती

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या समस्येवरून राज्य सरकारला चांगलं घेरलं आहे. हा मुद्दा रोहित पवार यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात देखील उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केली आहे. विद्यार्थी आस लावून बसलेले आहे. कृपया … Read more

Published On: 

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या समस्येवरून राज्य सरकारला चांगलं घेरलं आहे.

हा मुद्दा रोहित पवार यांनी विधानसभा पावसाळी अधिवेशनात देखील उपस्थित केला होता. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केली आहे.

विद्यार्थी आस लावून बसलेले आहे. कृपया या संदर्भात आपण संबंधित विभागाला निर्देश द्यावे, असं रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना म्हटलं आहे.

ट्विट करत रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, “नगरपरिषद आणि जिल्हापरिषद भरती संदर्भात परीक्षेचा फॉर्म भरताना MS-CIT प्रमाणपत्र अनिवार्य केले असल्याने अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता येत नाही.

राज्यसेवा तसेच इतर सरळसेवा भरतीमध्ये निवडीनंतर दोन वर्षाच्या कालावधीत MS-CIT प्रमाणपत्र द्यावे लागते, तीच अट नगरपरिषद आणि जिल्हा परिषद भरतीसाठी लागू केल्यास अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता येतील.

तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थी अर्ज करण्यास अपात्र होत असतील तर हा एक प्रकारचा अन्याय आहे. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अनेक विद्यार्थी आस लावून बसले आहेत. तरी आपण यासंदर्भात संबंधित विभागाला निर्देश द्यावेत ही विनंती.”

Sharad Pawar and Ajit Pawar had a secret meeting

दरम्यान, शनिवारी (12 ऑगस्ट) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती मिळाली आहे.

अजित पवार यांनी केलेल्या बंडखोरीनंतर त्यांची ही तिसरी भेट होती. त्यांच्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “मी अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीचं कारण स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळं याबाबत वारंवार प्रश्न विचारून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका.

महाविकास आघाडी एकत्र आहे आणि ती कायम एकत्रच राहणार. म्हणून तुम्ही यामध्ये संभ्रम निर्माण करू नका.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही