Share

Uddhav Thackeray | “…म्हणून शिंदेंची झोप उडाली”; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिदेंना टोला

🕒 1 min readUddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत खराब असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री अनुपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांना कधीही पद गमावे लागेल या … Read more

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची तब्येत खराब असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं पुण्यातील चांदणी चौक लोकार्पण सोहळ्यास मुख्यमंत्री अनुपस्थित होते.

याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटानं सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांना कधीही पद गमावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडलेली आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

Read Samana Editorial

राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही. चार दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिदि यांचा आजार बळावला.

त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीयनि घेतला पाहिजे. खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे. अनेक आजारांनी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे.

त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळय़ातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील. दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्यांचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न. महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत!

उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांच्या भेटीस वारंवार जात आहेत व शरद पवार या भेटी टाळत नाहीत हे गमतीचे आहे. काही भेटी उघडपणे झाल्या, तर काही गुप्तपणे झाल्याचे म्हटले जात आहे.

त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतो. असा संभ्रम निर्माण व्हावा यासाठीच भारतीय जनता पक्षाचे देशी चाणक्य अजित पवारांना अशा भेटीसाठी ढकलून पाठवतायत काय? या शंकेला बळ मिळत आहे.

अर्थात अजित पवारांच्या अशा भेटीने संभ्रम होईल, वाढेल यापलीकडे जनतेची मने पोहोचली आहेत. या रोजच्या खेळाने मनास एक प्रकारची बधिरता आली आहे व त्यास सध्याचे राजकारण जबाबदार आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे अनेकदा परखड विधाने करतात. त्यातही बरयाचदा गंमत असते. “अजित पवार हे ‘मविआ’त परत येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. अजितदादांना उपरती झाली असेल म्हणून ते शरद पवारांना भेटले असतील”, असे नाना म्हणाले.

त्याआधी नाना यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा आहे. राज्यातील सरकार हे ‘गंमत जंमत’ सरकार आहे” नानांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत आहोत, पण त्यात थोडी भर टाकून सांगतो, पवार काका पुतण्यांच्या अलीकडच्या भेटीचा प्रकारसुद्धा गंमत जंमत ठरत आहे.

नक्की कुणावर हसावे व कुणावर चिडावे, हे महाराष्ट्राला कळेनासे झालेय. श्री. शरद पवार यांची प्रतिमा अशा भेटीने मलिन होते व ते बरे नाही.

अजित पवार यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह भाजपची वाट धरल्यावर सगळयात मोठी गंमत झाली ती एकनाथ शिंदे व त्यांच्या गटाची. आता तर शिंदे आजारी पडले असून त्यांची प्रकृती खूपच खालावली आहे व त्यांना जबरदस्तीने इस्पितळात दाखल

करू, असे शिंदे यांचे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी जाहीर केले. शिंदे हे 24 तास काम करतात म्हणून ते आजारी पडले, पण शिंदे 24 तास काम करतात ते महाराष्ट्रात कोठेच दृष्य स्वरूपात दिसत नाही.

कधीही पद गमवावे लागेल या भीतीतून त्यांची झोप उडाली असेल तर त्यास 24 तास काम करणे असे म्हणता येत नाही. शिंदे यांची झोप उडाली की, ते ऊठसूट हेलिकॉप्टरने साताऱयातील त्यांच्या शेतावर आराम करतात म्हणजे 24 तास काम व पुढचे 72 तास आराम’ असे त्यांच्या जीवनाचे गणित दिसते व शिंद यांच्या आजाराचे खापर अजित पवार यांच्यावर फोडले जाते.

अजित पवार सरकारात घुसल्यावर शिंदे व त्यांच्या गटाच्या हृदयाचे ठोके वाढले आणि मन अस्थिर झाले. त्यात अजित पवार हे अधूनमधून शरद पवारांना भेटू लागल्याने या सगळयांच्याच लहान मेंदूस त्रास सुरू झाला, पण त्यासाठी दूर सातारयात जाऊन सततच आराम करणे हा उपाय नाही.

शिंदे गटाने त्यांच्या नेत्यास तत्काळ मुंबई-ठाण्यातील इस्पितळात दाखल करून उपचार सुरू केले पाहिजेत शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सातारयात जाऊन गावठी उपचार, जडीबुटी, जादूटोणा, बुवाबाजीच्या माध्यमातून उपचार करून घेणे योग्य नाही.

आरोग्य हीच संपत्ती आहे व त्या संपतीचे रक्षण खोक्यांनी होत नाही. दुसरे असे की, मुख्यमंत्रीपदाचा अमरपट्टा घेऊन कोणीच जन्मास आलेले नाही.

‘मी पुन्हा येणार’ वाल्यांनाही ‘उप’ वगैरे होऊन उपऱयांच्या पखाली वाहाव्या लागत आहेत, पण शिंदे यांना वाटते शेवटच्या श्वासापर्यंत फक्त आपणच, पण अजित पवारांमुळे त्यांच्या श्वासनलिकेत अडथळे निर्माण झाले व त्यांना अलीकडे गुदमरल्यासारखे होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना नक्की काय त्रास होतोय? त्यांचा आजार किती खोलवर

पसरलाय ? आजाराचे मूळ काय? याबाबत आरोग्य मंत्र्यांनी विशेष बुलेटिन जारी केले तर बरे होईल. शिंदे यांची प्रकृती चिंता करावी अशी आहे हे आमदार शिरसाटांचे म्हणणे खरे असेल तर त्यांना लगेच अतिदक्षता विभागात दाखल करून पुढचे उपचार करावे लागतील व त्यांच्या आसपास अजित पवार किंवा देवेंद्र फडणवीस यांना फिरकू न देण्याची काळजी घ्यावी लागेल.

महाराष्ट्राच्या राजकारणास सध्या ज्या आजाराने ग्रासले आहे, त्या आजाराचा किडा मुख्यमंत्र्यांच्या शरीरात असून त्याचा वेळीच बंदोबस्त केला नाही, तर हा किडा महाराष्ट्राचे समाजमन पोखरून काढल्याशिवाय राहणार नाही.

अजित पवार वारंवार शरद पवारांना भेटतात हा एक साथीचा आजार आहे व मुख्यमंत्री शिंदे आजारी पडून वारंवार विश्रांतीसाठी साताऱयातील शेतावर हेलिकॉप्टरने उतरतात हा महाराष्ट्रास लागलेला मानसिक आजार आहे. या दोन्ही आजारांत गुप्त असे काहीच राहिलेले नाही राजकारणातील डिजिटल युगात गुप्त राहील असे काहीच नाही.

चार दिवसापूर्वी गृहमंत्री अमित शहा पुण्यात आले व त्या भेटीत महाराष्ट्रातील नेतृत्व बदलाच्या दृष्टीने गुप्त खलबते झाल्याची गुप्त बातमी फुटल्याने मुख्यमंत्री शिंदे यांचा आजार बळावला त्यांच्या गटाच्या लोकांनी हा आजार गांभीयान घेतला पाहिजे खरे तर हा रोग महाराष्ट्राला लागला आहे व अशा रोगाचे लवकरात लवकर उच्चाटन होईल तेवढे बरे अनेक आजारानी सध्या महाराष्ट्र कृश व जर्जर झाला आहे.

त्यात दिल्लीच्या टोळधाडी महाराष्ट्रावर हल्ले करीत आहेत. या सगळयातून महाराष्ट्र पुन्हा उभा राहील दोन पवारांची ‘गंमतभेट’ व मुख्यमंत्र्याचा वाढता आजार हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न महाराष्ट्र म्हणजे ‘गंमत जंमत’ नाही हे आम्ही येथे परखडपणे बजावत आहोत!

सौजन्य- सामना

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!