Share

Sanjay Shirsat | “मुख्यमंत्री शिंदेंना बळजबरीने ॲडमिट…”; संजय शिरसाटांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत

🕒 1 min readSanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हजर नसल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्री शिंदे आपल्या साताऱ्यातील दरे गावी गेल्यामुळं या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, असं म्हटलं जात आहे.Related … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Shirsat | छत्रपती संभाजीनगर: आज पुण्यातील चांदणी चौक पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.

मात्र, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हजर नसल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. मुख्यमंत्री शिंदे आपल्या साताऱ्यातील दरे गावी गेल्यामुळं या कार्यक्रमाला येऊ शकले नाही, असं म्हटलं जात आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र ते ऑनलाईन देखील आले नाही. या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Eknath Shinde works 24 hours a day – Sanjay Shirsat

प्रसार माध्यमांशी बातचीत करत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास काम करतात आणि हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे.

मात्र, सध्या मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत खराब आहे. त्यामुळं आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडं जाण्याची विनंती केली आहे. 15 ऑगस्टनंतर त्यांना ‘बळजबरीनं’ हा शब्द मुद्दाम लक्षात ठेवा.

त्यांना आम्ही बळजबरीनं हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही, एवढी त्यांची तब्येत खराब आहे.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “आम्ही सगळे एकत्र येऊन काम करत आहोत. अजित पवारांनी वॉर रूमवर अतिक्रमण केलेलं नाही.

कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून निघालेली ही एक फक्त कल्पना आहे. सगळे एकत्र येऊन काम करत आहे, हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.”

यावेळी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “पालकमंत्री पदावरून आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. मात्र, आमच्यामध्ये वाद घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक काही लोक ही माहिती पसरवत आहे.

त्यांना काही काम धंदा नाही म्हणून ते अशा प्रकारचे वक्तव्य करतात. संजय राऊत यांना आधी त्यांचा पक्ष सांभाळण्याची गरज आहे. त्याचबरोबर संजय राऊत यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची गरज आहे. कारण त्यांना उपचारांची सक्त गरज आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!