🕒 1 min read
Ajit Pawar | पुणे: आज (12 ऑगस्ट) पुण्यातील चांदणी चौक उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते या पुलाचं उद्घाटन झालं.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही बेअक्कल आहोत का? असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
Everyone thinks that we have our eye on the Chief Minister’s chair – Ajit Pawar
अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “सर्वांना वाटतं की मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आमचा डोळा आहे. अरे पण मुख्यमंत्र्यांची खुर्ची भरलेली आहे. त्यावर एक व्यक्ती बसलेली आहे.
त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा ठेवायला आम्ही काय बेअक्कल आहोत का? एक खुर्ची असेल तर त्यावर दोघांचा डोळा असून कसं चालेल? मला हा विषय आत्ता काढायचा नव्हता. मात्र, आम्ही या विषयावर प्रतिक्रिया दिली नाही तर एकच बाजू दिसते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. यावेळी बोलत असताना अजित पवारांनी या विषयावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, “विजय वडेट्टीवार सध्या विधानसभा विरोधी पक्षनेते पदावर विराजमान आहे. हे एक जबाबदार पद आहे. त्यामुळं या पदावर विराजमान असलेल्या व्यक्तींनं जबाबदारीनं बोलायला हवं.
उगाच उचलली जीभ लावली टाळ्याला, असं बोलणं योग्य दिसत नाही. एकनाथ शिंदे आणि आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉल्ड वॉर सुरू नाही.”
चांदणी चौक पुलाच्या लोकार्पण सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. यावर बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “परवापासूनच एकनाथ शिंदे यांना त्रास होत होता.
त्यामुळं आम्ही सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना दोन-तीन दिवस आराम करायला सांगितलं आहे. शेवटी प्रत्येकाला आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळं सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | उचलली जीभ लावली टाळ्याला; अजित पवारांची विजय वडेट्टीवारांवर टीका
- Ajit Pawar | मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवारांमध्ये कोल्ड वॉर सुरू? पवारांनी स्पष्टच सांगितलं
- Sanjay Raut | देशद्रोह कायद्यावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, “ब्रिटिशांपेक्षा भयंकर…”
- Ashish Shelar | “समर्पणाचा सूर्य तुमच्या अहंकाराला…”; आशिष शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टीका
- Prakash Ambedkar | पीएम नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक ठरतायं – प्रकाश आंबेडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










