Ajit Pawar | पुणे: गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या खात्यात ढवळाढवळ सुरू केली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.
या सर्व चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला आहे. पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे.
As Finance Minister I can review development works and projects – Ajit Pawar
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोणत्याही कामांमध्ये हस्तक्षेप केला नाही. मात्र, अर्थमंत्री म्हणून मी विकास कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेऊ शकतो.
त्यामध्ये तुम्हाला काय त्रास होत आहे? माहित नाही. महाविकास आघाडीचं सरकार असताना देखील मी प्रत्येक पंधरा दिवसांनी आढावा बैठक घ्यायचो आणि त्या कामाबद्दल जाणून घ्यायचो. आताही आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत.”
पुढे बोलताना ते (Ajit Pawar) म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास काम आणि प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
ते स्वतः त्या समितीचं नेतृत्व करत आहे. तर मी माझ्या पद्धतीनं या समितीचा आढावा घेतो. कारण महाराष्ट्राचा विकास व्हावा, लोकांचे प्रश्न सुटावे, यासाठी आम्ही राज्य सरकारमध्ये सामील झालो आहोत.
“मी घेतलेल्या बैठकीमुळे राज्याचे प्रश्न, मेट्रोचे प्रश्न, विकास कामं मार्गी लागत असतील तर यामध्ये काय अडचण आहे? यंत्रणा थोडीशी हलवली की काम होतात. या बैठकीमध्ये पॉलिटेक्निक, महावितरण आणि खाजगी जागेच्या प्रश्न होते.
या सर्व गोष्टींचा मी आढावा घेतला आहे. देशपातळीवर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही सत्तेत सामील झालो आहोत. यामध्ये लोकांना काय समस्या होत आहे? काय माहित?” असही ते यावेळी (Ajit Pawar) म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | देशद्रोह कायद्यावरून संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा; म्हणाले, “ब्रिटिशांपेक्षा भयंकर…”
- Ashish Shelar | “समर्पणाचा सूर्य तुमच्या अहंकाराला…”; आशिष शेलारांची ठाकरे गटावर बोचरी टीका
- Prakash Ambedkar | पीएम नरेंद्र मोदी देशासाठी धोकादायक ठरतायं – प्रकाश आंबेडकर
- Uddhav Thackeray | “अमित शाह मोदींची वैयक्तिक गरज म्हणून…”; ठाकरे गटाची नरेंद्र मोदींवर खोचक टीका
- Eknath Khadse | “नवाब मालिकांना भाजप ऑफर…”; एकनाथ खडसेंचं खळबळजनक विधान