Prakash Ambedkar | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूर हिंसाचार प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चाललं आहे. याचे पडसाद विधानसभा आणि लोकसभेमध्ये देखील दिसून आले.
या मुद्द्यावरून विरोधात आक्रमक झाले आहे. अशात प्रकाश आंबेडकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) देशासाठी धोकादायक झाले आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या हिंदू संघटनांनी पुन्हा एकदा विचार करायला हवा.
कारण पीएम मोदी देशासाठी धोकादायक झाले आहे. मैतेई समाजाने आदिवासीचा दर्जा मागितला नसताना त्यांना तो दर्जा का देण्यात आला? कुणी तशी मागणी केली होती का? या प्रश्नांचं उत्तर नरेंद्र मोदी यांनी द्यायला हवं.”
यावेळी बोलत असताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी विरोधकांच्या बैठकीबद्दल देखील भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “मुंबईमध्ये विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक होणार आहे.
मात्र या बैठकीचं अद्याप कुणालाही आमंत्रण देण्यात आलेलं नाही. या बैठकीच्या निमंत्रणाची मी वाट बघत आहे. मात्र, मला अजून याबाबत कोणाचंही निमंत्रण आलेलं नाही. माझ्यासारख्या भाजप विरोधात असणाऱ्यांना ते त्यांच्यात का घेत नाही?”
Uddhav Thackeray never breaks his word – Prakash Ambedkar
“मला महाविकास आघाडीमध्ये सामील करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उचलली आहे. उद्धव ठाकरे कधीच दिलेला शब्द मोडत नाही.
ते नेहमी कमी बोलतात. मात्र ते नेहमी मुद्द्याचं आणि ठोस बोलतात. त्यामुळं मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असही ते (Prakash Ambedkar) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | “अमित शाह मोदींची वैयक्तिक गरज म्हणून…”; ठाकरे गटाची नरेंद्र मोदींवर खोचक टीका
- Eknath Khadse | “नवाब मालिकांना भाजप ऑफर…”; एकनाथ खडसेंचं खळबळजनक विधान
- Eknath Shinde | कोल्ड वॉरमुळं मुख्यमंत्री शिंदेंची पुणे चांदणी चौक लोकार्पण समारंभाला दांडी?
- Aditya Thackeray | “खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी…”; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका
- Rahul Gandhi | “मणिपूर जळत असताना पीएम मोदी हसत…”; राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात