Share

Aditya Thackeray | “खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी…”; आदित्य ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना काही अज्ञातांकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे.

महाजन यांनी आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांना शिवीगाळ केल्यामुळं हा प्रकार घडला असल्याचं बोललं जात आहे. मात्र, ही मारहाण किशोर पाटील यांच्या सांगण्यावरून झाली असल्याचं संदीप महाजन यांनी म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Maharashtra lovers will end your dictatorship and bullying – Aditya Thackeray

ट्विट करत आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) म्हणाले, “शासन आपल्या दारी! हिसांचार महाराष्ट्रभर करी! मिंधे-भाजप सरकार कधी गणपती बाप्पाच्या मिरवणूकीत बंदूक काढणारं असतं.

कधी पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार करणारं असतं, तर कधी उद्योजकांना ॲाफिसमध्ये बंदूकीचा धाक दाखवणारं, तर कधी भर रस्त्यात पत्रकारांना मारझोड करणारं असतं. हे खोके सरकार महाराष्ट्रात गुंडगिरी करणारं असतं.

महिलांना शिवीगाळ करणारे निर्लज्ज लोक मंत्रीपदावर बसतात आणि मिंधे मुख्यमंत्री त्यावर मूग गिळून गप्प बसतात! राज्यकर्ते म्हणून हे असे लोक शोभतात का?

मिंधे-भाजपाचं सरकार असताना महाराष्ट्रात उद्योगधंदे सुरु करायला कोण धजावणार? महाराष्ट्राला बदनाम करणारी गद्दारी केलीच, वर इथले उद्योगधंदे गुजरातला पळवून महाराष्ट्राशी गद्दारी केली आणि वर महाराष्ट्रात असं वातावरण निर्माण केलंय.

पण महाराष्ट्र हे प्रकार पाहतोय, लक्षात ठेवतोय! आता आम्ही महाराष्ट्रप्रेमी तुमची हुकूमशाही आणि गुंडगिरी संपवणारच!

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार घडला होता. या ठिकाणी एका 08 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्भृण हत्या करण्यात आली होती.

या घटनेनंतर पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाब विचारत त्यांच्यावर टीका केली होती. यानंतर आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना शिवीगाळ केलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना हात-पाय तोडण्याची धमकी दिली असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला आलं होतं. त्यानंतर संदीप महाजन यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यामुळं महाजन यांच्यावर किशोर पाटील यांनी हल्ला केला असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Aditya Thackeray | टीम महाराष्ट्र देशा: जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना काही अज्ञातांकडून बेदम मारहाण करण्यात आली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News

Join WhatsApp

Join Now