Kishori Pednekar | ठाकरेंच्या चिंतेत वाढ! किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी होण्याची शक्यता

Kishori Pednekar | मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर दिवसेंदिवस संकटात सापडत चालल्या आहे.

मुंबई महानगरपालिका कथित कोविड घोटाळा प्रकरणावरून किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला होता.

या घटनेनंतर आता ईडी देखील ॲक्शन मोडमध्ये येणार असल्याचं बोललं जात आहे. पेडणेकर यांच्या विरोधात ईडी देखील गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर ठाकरे गट आणि किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

ED has sought information about the allegations against Kishori Pednekar

ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची चौफेर कोंडी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेनं किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यानंतर आता ईडी देखील त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करणार असल्याचं बोललं जात आहे. ईडीनं आर्थिक गुन्हे शाखेकडून किशोरी पेडणेकर यांच्यावरील आरोपांची माहिती मागवली आहे.

कोविड कालावधीमध्ये मृतदेहांच्या बॅगची किंमत जास्त दाखवून गैरव्यवहार करत फसवणूक केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर करण्यात आला आहे.

कोरोना काळामध्ये मृत पावलेल्या रुग्णांसाठी बॉडीबॅग खरेदी करण्यात आल्या होत्या. एका बॉडीबॅगची किंमत 1300 रुपये होती. मात्र, पेडणेकर यांच्या सांगण्यावरून एक बॉडीबॅग 6800 रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मुंबई महानगरपालिका कोविड घोटाळा प्रकरणावरून ठाकरे गटाच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. किशोरी पेडणेकर यांच्याआधी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांची याप्रकरणी चौकशी झाली आहे.

सुरज चव्हाण यांच्या घरी ईडीनं छापेमारी केली होती. ईडीच्या तब्बल पाच अधिकाऱ्यांनी चव्हाण यांची कसून चौकशी केली होती.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.