Sanjay Shirsat | मुंबई: आज सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटावर खोचक टीका केली आहे.
जनता आणि निसर्ग दोन्हीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पाठीशी नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
त्याचबरोबर यावेळी बोलत असताना संजय शिरसाट यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ठाकरे कुटुंबातील व्यक्ती तुरुंगात जाणार असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.
कोविड घोटाळा प्रकरणातील संशयित आरोपी सुजित पाटकर यांनी ईडीच्या विरोधात साक्ष दिली आहे. मला धाक दाखवून माझ्याकडून साक्ष घेतली असल्याचं सुजित पाटकर यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) म्हणाले, “कुणीही तुम्हाला उगाच चौकशीसाठी बोलवणार नाही. त्याचबरोबर उगाच तुम्हाला कस्टडीत घेतलं जाणार नाही.
धाक दाखवून आणि मारून आरोप सिद्ध केले जात नाही. तुम्ही जर गुन्हा केला असेल तर तुम्हाला शिक्षा होतेच. त्यामुळे तुम्हाला आता तुरुंगात जावं लागणार आहे.
या प्रकरणामध्ये संजय राऊत, अनिल परब आणि ठाकरे कुटुंबातील कोणी असेल तर ते तुरुंगात जातील. पुरावे असतील तर याचिका दाखल करून काही होत नाही.
Sanjay Raut just babbles – Sanjay Shirsat
यावेळी बोलत असताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “संजय राऊत उगाच बडबड करतात. कुठे, केव्हा, कधी, काय बोलावं? हे त्यांना कळत नाही.
त्यांनी जेवण डिप्लोमसी, हेलिकॉप्टर यावर बेताळ बडबड केली आहे. त्यांना सत्तेच्या खुर्चीत बसता आलं नाही हा त्यांचाच पायगुण होता. एकनाथ शिंदे यांच्याकडे जायला आम्हाला आमंत्रणाची गरज नाही.
त्याचबरोबर एकनाथ शिंदे कधीच एकटे जेवायला बसत नाही. त्यांच्यासोबत दररोज चार ते पाच आमदार असतात.”
महत्वाच्या बातम्या
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंना भाजपकडून मोठा धक्का! कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा आग्रह
- Amol Kolhe | पराभव आधी रणात नाही, मनात होतो; अमोल कोल्हेंचं मोदी सरकारवर टीकास्त्र
- Jitendra Awhad | जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी सोडणार? ‘त्या’ ट्विटमुळे चर्चांना उधान
- Sharad Pawar | देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार दिसणार एकाच मंचावर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
- Sanjay Raut | “शिंदेंचे आमदार मारामारी करतील म्हणून…”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका