Share

Sanjay Raut | “शिंदेंचे आमदार मारामारी करतील म्हणून…”; संजय राऊतांची शिंदे गटावर टीका

Sanjay Raut | मुंबई: काल (10 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. मात्र, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जनता आणि निसर्ग … Read more

Published On: 

Sanjay Raut | मुंबई: काल (10 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं.

मात्र, ऐनवेळी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी जनता आणि निसर्ग दोन्हीही नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Eknath Shinde hosted the luncheon yesterday – Sanjay Raut 

आज सकाळी प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मा. मुख्यमंत्री यांनी काल स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं. मात्र, अचानक हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

जेवणामध्ये त्यांचे आमदार मारामाऱ्या करतील, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहीत होतं. काल एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर देखील उडू शकले नाही. यावरून हे लक्षात येत आहे की त्यांच्या बाजूनं जनता आणि निसर्ग दोन्हीही नाही.

सध्या सगळा औटघटकेचा कारभार सुरू आहे. 2024 मध्ये देशात इंडिया आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. तेव्हा ही लोकं कुठे जातील?

आज या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांचा छळ मांडला आहे. 2024 मध्ये या खोट्या लोकांना आम्ही उत्तर देणार आहोत. त्यावेळी या सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जाईल. त्यावेळी कुणावरही दयामाया केली जाणार नाही.”

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आवाज कोणाचा या पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.

ते म्हणाले, “मला बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास सर्वाधिक लाभला आहे. आमच्या दोघांचं नातं खूप जवळचं होतं. जेव्हा मी सामनामध्ये आलो तेव्हा मला अग्रलेखाबद्दल जास्त माहिती नव्हती.

मात्र, लिखाणाबाबत मी कधीच माघार घेतली नाही. बाळासाहेब अनेकदा अग्रलेख वाचायचे. काही चुकलं तर ते वडिलांप्रमाणे रागवायचे आणि अग्रलेख आवडला तर कौतुकही करायचे.

अनेकदा त्यांनी जाहीर सभेमध्ये याबद्दल कौतुक केलं आहे. वरिष्ठ आणि प्रमुख लोकांशी ते माझी सहसंपादक म्हणून ओळख करून द्यायचे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही