Bacchu Kadu | सचिन तेंडुलकरच्या विरोधात बच्चू कडू आक्रमक; म्हणाले, “थेट घरासमोर आंदोलन…”

Bacchu Kadu | नागपूर: प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) विरोधात आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमध्ये भाग घेऊ नये, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. सचिन तेंडुलकर यांनी जर ऑनलाइन गेमच्या जाहिरातीतून माघार घेतली नाही तर त्यांच्या घरासमोर प्रहार स्टाईलने आंदोलन केलं जाणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना बच्चू कडू म्हणाले, “ऑनलाइन गेमच्या जाहिरातीबद्दल सचिन तेंडुलकर यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलं पाहिजे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. त्याचबरोबर ते भारताचा अभिमान देखील आहे.

त्यामुळं ऑनलाइन गेमबाबत त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली पाहिजे. ऑनलाइन गेमच्या जाहिरातीमधून सचिन तेंडुलकर यांनी बाहेर पडावं, अशी आमची मागणी आहे. असं नाही झालं तर आम्हाला यावर पर्यायी वेगळा मार्ग शोधावा लागेल.

आपल्या देशातील लोकांची ऑनलाइन गेमपासून सुटका व्हावी, म्हणून आम्ही त्यांना नारळ पाणी देऊ. आम्ही त्यांना यातून बाहेर निघा यासाठी नारळ देऊन विनंती करू.”

Online games are having a huge impact on the young generation – Bacchu Kadu

पुढे बोलताना ते म्हणाले, “प्रहार संघटना नेहमी वेगवेगळ्या स्टाईलमधून आंदोलन करते. आम्ही नारळ देऊन सचिन तेंडुलकर यांना सांगणार आहोत की ऑनलाईन गेमच्या जाहिरातीच नाही तर ऑनलाईन गेम देखील बंद करा.

कारण तरुण पिढीवर ऑनलाईन गेमचा खूप मोठा दुष्परिणाम होत आहे. या पार्श्वभूमीवर पालकांमध्ये देखील प्रचंड रोष निर्माण झाला आहे. अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन गेम बंद होताना दिसत आहे. त्यामुळं आपल्याला देखील याबाबत ठोस निर्णय घ्यावा लागणार आहे.”

“सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न देण्यात आला आहे, म्हणून आम्ही त्यांच्याकडं ही मागणी केली आहे. ते जर भारतरत्न नसते तर आम्ही त्यांच्याकडं ही मागणी केली नसती.

ऑनलाइन गेमच्या जाहिराती बंद करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही त्यांना 15 दिवसांचा वेळ देऊ. 15 दिवसांमध्ये या जाहिराती बंद नाही झाल्या तर आम्ही त्यांच्या घरासमोर आंदोलन करू”, असही ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.