Sanjay Raut | टीम महाराष्ट्र देशा: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दररोज प्रसार माध्यमांसमोर येऊन सरकारवर टीका करत असतात. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी ‘आवाज कोणाचा’ या पॉडकास्ट मुलाखत दिली आहे.
या मुलाखतीमध्ये बोलत असताना संजय राऊत यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्याचबरोबर या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या आणि बाळासाहेबांच्या नात्याबद्दल सांगितलं आहे.
शिवसेना ही उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) नाही, तर बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “आतापर्यंत मी सर्वात जास्त बाळासाहेबांच्या सहवासामध्ये राहिलो आहे. मला बाळासाहेबांचा सहवास सर्वाधिक लाभला आहे. त्यांचं आणि माझं खूप जवळचं नातं होतं.
जेव्हा मी सामनामध्ये आलो तेव्हा मला अग्रलेख लिहिता येत नव्हता. मात्र, मी लिखाणाबाबत कधीच माघार घेतली नाही. या विषयांवर बाळासाहेबांसोबत नेहमी चर्चा व्हायची. ते नेहमी अग्रलेख वाचायचे.
त्यांना अग्रलेख आवडला तर ते शाब्बासकी द्यायचे आणि काही चुकलं तर वडिलांप्रमाणे रागवायचे. पण मात्र जाहीर सभांमधून त्यांनी अनेकदा कौतुकही केलं आहे. प्रमुख आणि वरिष्ठ लोकांशी ते माझी सहसंपादक म्हणून ओळख करून द्यायचे.”
I have learned many things from Balasaheb Thackeray – Sanjay Raut
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “मी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून अनेक गोष्टी शिकलो आहे. यामध्ये प्रामुख्याने मी त्यांच्याकडून बेडरपणा शिकलो आहे.
मराठी माणसाला लोक घाटी कोकणी म्हणत होते, भिकारी म्हणत होते. त्याचबरोबर मराठी माणसाला कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा नव्हती. बाळासाहेबांनी 50 वर्ष अथक प्रयत्न आणि कष्टानं मराठी माणसाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणतात शिवसेना माझी आहे. मात्र ही शिवसेना उद्धव ठाकरेंची नाही तर ही शिवसेना बाळासाहेबांची आहे. आम्ही सगळे बाळासाहेबांचे विचार घेऊन या प्रवाहात आलो आहोत.”
“माझा नेहमी लेखणीवर खूप विश्वास आहे. लेखणीनं क्रांती घडू शकते, असं माझं ठाम मत आहे. कारण जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती घडली तेव्हा तेव्हा वृत्तपत्र काढलं गेलं आहे.
देशामध्ये स्वातंत्र्याचा संदेश तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी सुरू केला होता. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक माध्यम निर्माण झाली असली तरी माझा कागद आणि पेन यावरच विश्वास आहे. कारण क्रांती फक्त यामधूनच घडू शकते”, असही ते (Sanjay Raut) म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Jitendra Awhad | “जुना जितेंद्र आव्हाड असता तर कानशील…”; जितेंद्र आव्हाड का संतापले?
- Amol Mitkari | “… म्हणून त्याला कुणी फ्लाईंग किस म्हणू नये”; अमोल मिटकरींचं मोठं विधान
- Sushma Andhare | “स्मृती इराणी यांच्या बुद्धीची आम्हाला कीव…”; सुषमा अंधारेंची फ्लाईंग किस प्रकरणावर प्रतिक्रिया
- Sambhaji Bhide | संभाजी भिडेंच्या अडचणीत वाढ! महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधींनी केली तक्रार
- Chitra Wagh | “देशाला वाचवायचं असेल तर राहुल गांधींचं लग्न…”; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात