Amol Mitkari | “… म्हणून त्याला कुणी फ्लाईंग किस म्हणू नये”; अमोल मिटकरींचं मोठं विधान

Amol Mitkari | मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधी यांनी महिला खासदारांना फ्लाईंग किस दिली आहे. त्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवा वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठं विधान केलं आहे. यावेळी अमोल मिटकरी यांनी राहुल गांधी यांची बाजू मांडली आहे.

Some documents fell from Rahul Gandhi’s hands – Amol Mitkari

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राहुल गांधी यांच्या हातातील काही कागदपत्र पडली होती. त्यामुळं राहुल गांधी यांनी बोटानं  इशारा दिला. म्हणून याला कुणी फ्लाईंग किस वगैरे म्हणू नये.

फ्लाईंग किसच्या मुद्यापेक्षा देशामध्ये अनेक महत्त्वाचे आणि मोठे मुद्दे आहेत. यामध्ये महिला अत्याचार, बेरोजगारी, महागाई यासारखे विषय आहे. फक्त बोट दाखवायला जर कुणी फ्लाईंग किस म्हणत असेल, तर त्याला काही अर्थ नाही.

आम्ही सध्या सत्तेत सामील झालो असलो तरी व्यक्तिगत मत मांडण्याचा अधिकार आम्हाला आहे. त्यामुळं आपण आंदोलन कशासाठी करत आहोत? याबद्दल चित्राताईंनी एकदा विचार केला पाहिजे.

दरम्यान, या प्रकरणावरून सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी स्मृती इराणी यांच्यावर टीकास्त्र चालवलं आहे. त्या म्हणाल्या, “स्मृती इराणी एक उत्तम अभिनेत्री आहे. मात्र, त्यांनी त्यांचा अभिनय संसद आणि राजकारणामध्ये करू नये.

संसदेमध्ये प्रत्येकानं आपल्या खात्याशी निगडित विषयावर बोलायला हवं. काल लोकसभेमध्ये फ्लाईंग किस हा प्रकार घडलेलाच नाही. मात्र, स्मृती इराणी यांनी हा मुद्दा उचलून धरला आहे.

स्मृती इराणी मुद्द्यावर ज्या प्रकारे आक्रमक झाल्या होत्या, त्या प्रकारे त्यांना मणिपूर मुद्द्यावर आक्रमक होण्याची गरज होती.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.