Share

Ambadas Danve | “आधी किरीट सोमय्यांची चौकशी करा आणि मग राहुल गांधी…”; अंबादास दानवेंची राज्य सरकारवर टीका

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.

राहुल गांधींनी लोकसभेच्या आवारात फ्लाईंग किस दिला आहे. राहुल गांधी यांनी स्त्रियांचा अपमान केलेला असून त्यांच्यावर कारवाई व्हावी, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

या घटनेनंतर भाजपच्या 22 महिला खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना भेटून राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याच पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “राज्य सरकारनं किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या व्हायरल व्हिडिओवर काय कारवाई केली आहे? याचं उत्तर आधी त्यांनी घ्यावं.

किरीट सोमय्या प्रकरणाबाबत मी स्वतः विधान परिषद सभापतींना व्हिडिओचा एक पेन ड्राईव्ह दिला होता. त्याचबरोबर सोमय्या यांचा व्हिडिओ अनेक चॅनेलवर दाखवला गेला होता.

त्यामुळं सरकारनं आधी त्याबाबत आम्हाला स्पष्टीकरण द्यावं. राज्य सरकारला राहुल गांधींच्या विषयावर आम्हाला शिकवण्याची गरज नाही. आधी तुम्ही सोमय्या यांच्या विषयी बोला आणि मग राहुल गांधींवर टीका करा.”

Rahul Gandhi has given a flying kiss of love to the country -Sanjay Raut

दरम्यान, या प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “भाजप सरकार कधी कोणत्या गोष्टीचं राजकारण करेल? काही सांगता येत नाही.

राहुल गांधी यांनी द्वेष, राग, बदला यावर उतारा म्हणून संपूर्ण देशाला प्रेमाचा फ्लाईंग किस दिला आहे. राहुल गांधींनी देशात प्रेमाचं एक दुकान उघडलं आहे.

फ्लाईंग किस या दुकानातील सर्वात महत्त्वाचं शस्त्र आहे. मात्र, ज्यांना प्रेम आणि ममत्त्वाची सवय राहिलेली नाही. त्यांना फ्लाईंग किस म्हणजे काय ते कळणार नाही.”

महत्वाच्या बातम्या

Ambadas Danve | टीम महाराष्ट्र देशा: भाजप नेत्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics

Join WhatsApp

Join Now