Devendra Fadnavis | फॉक्सकॉन महाराष्ट्रामध्येच येणार – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis | टीम महाराष्ट्र देशा: परदेशी गुंतवणूक करण्यात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असले तरी गेल्यावर्षी वेदांता, फॉक्सकॉन यासारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले आहे.

या प्रकरणावरून विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत मोठं विधान केलं आहे. फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावच लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Foxconn will have to come to Maharashtra – Devendra Fadnavis

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, “वेदांता आणि फॉक्सकॉन हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलेले आहे. तीन वेळा आपण फॉक्सकॉनला गमावलं आहे.

दोन वेळा आंतरराष्ट्रीय स्थितीमुळे आणि एकदा राज्यातल्या धोरण लकव्यामुळे आपल्याला हा प्रकल्प गमवावा लागला आहे. राज्यामध्ये गुंतवणूक समितीची 18 महिने बैठक झाली नव्हती.

त्यामुळे हे प्रकल्प गेले आहेत. मात्र महाराष्ट्र हे एक चुंबक आहे. त्यामुळे फॉक्सकॉनला महाराष्ट्रात यावच लागेल.”

यावेळी बोलत असताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल देखील मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, “जो ज्यादा बिकता है, उस विषय पर चर्चा होती है.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत चांगल्या पद्धतीने संवाद साधतात. देशामध्ये मोदी हा एक सर्वात मोठा ब्रँड आहे. नरेंद्र मोदी जेव्हा बोलतात तेव्हा सर्वसामान्य माणसाला वाटतं की ते आपल्यासाठीच बोलत आहेत.”

दरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या प्रकल्पाची गुंतवणूक तब्बल 01 लाख 66 हजार कोटींची होती.

त्यामुळं जर हा प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आला तर राज्यातील अनेक बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते. हा प्रकल्प राज्यात आल्यामुळं अनेकांना प्रत्यक्ष रोजगाराची संधी प्राप्त होईल. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.