Eknath Shinde | टीम महाराष्ट्र देशा: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार घडत आहे. या मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं घेरलं आहे.
या मुद्द्यावरून विरोधकांनी लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकावर जोरदार टीका केली आहे. हा प्रस्ताव मांडून विरोधकांनी स्वतःच वस्त्रहरण केलं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करत विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. ट्विट करत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय.
खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला आहे.
त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली आहे. कॉंग्रेसच्या ५५-६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामे झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या ९ वर्षांत झाला आहे. जगभरात पंतप्रधानांच्या नेतृत्वाला जी मान्यता मिळत आहे, ती पाहून विरोधकांचा जळफळाट झाला आहे.”
देशभरात विश्वास गमावलेल्या विरोधी पक्षाने संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडलाय. खरं तर या ठरावावर चर्चा घडवून विरोधक स्वतःचेच ‘वस्त्रहरण’ करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 10, 2023
The people of the country have repeatedly distrusted the opposition – Eknath Shinde
पुढे ते (Eknath Shinde) म्हणाले, “देशातील जनतेने विरोधकांवर वारंवार अविश्वास दाखवलाय. २०१४ आणि २०१९ मध्ये सामान्य नागरिकांचा प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्यावरील प्रगाढ विश्वास दिसून आला. २०२४ साली तो वृद्धिंगत होईल, याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.
भारताच्या नागरिकांना आता फक्त सर्वांगीण प्रगती आणि आर्थिक विकास हवा आहे. एकमेकांचे हात हाती घेऊन ऐक्याच्या घोषणा देणारे आणि पायात पाय घालून पाडण्याची संधी शोधणारे विरोधक आता कालबाह्य झाले आहेत.
ते अविश्वास ठरावावर तोंडावर कसे आपटतात, हे गेल्या दोन दिवसांपासून सारा देश पाहतोय. पंतप्रधानांचे आणि एनडीएच्या घटक पक्षांचे स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, यात मला तीळमात्र शंका वाटत नाही.”
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | पत्रकार मारहाण प्रकरणावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिंदे साहेब सत्तेची नशा…”
- Sanjay Raut | राहुल गांधींनी देशाला जादूचा फ्लाईंग किस दिलायं – संजय राऊत
- Prakash Ambedkar | येत्या दीड महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार – प्रकाश आंबेडकर
- Uddhav Thackeray | “भ्रष्टाचाऱ्यांवर आधी ईडी लावायची आणि मग…”; ठाकरे गटाची भाजपवर टीका
- Ambadas Danve | “…तर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हलू दिली नसती”; अंबादास दानवेंचं खळबळजनक विधान