Share

Rohit Pawar | पत्रकार मारहाण प्रकरणावर रोहित पवारांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाले, “शिंदे साहेब सत्तेची नशा…”

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.

आमदार किशोर पाटील (Kishore Patil) यांना शिवीगाळ केल्यामुळं काही अज्ञातांनी त्यांना मारहाण केली असल्याचं बोललं जात आहे. किशोर पाटील यांनीच ही मारहाण केली असल्याचा आरोप संदीप महाजन यांनी केला आहे.

या प्रकरणावरून आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सत्तेची नशा अशी असते का? असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

संदीप महाजन मारहाण प्रकरणावर आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ट्विट करत रोहित पवार म्हणाले, “पत्रकाराला फोनवर आई- बहिणी वरून शिवीगाळ करायची,मारण्याची धमकी द्यायची,दुसऱ्या दिवशी त्या पत्रकाराला गुंड पाठवून मारहाण करायची ..का ?

तर त्याने विरोधात बातमी छापली म्हणून, विशेष म्हणजे ज्या चौकात मारहाण झाली त्या चौकाला या पत्रकाराच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव दिलेले आहे.ही घटना बघून स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या डोळ्यात देखील नक्कीच पाणी असेल.

आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का? लोकशाही मूल्यांना , स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ?

हा प्रश्न आज सर्वसामान्य जनता विचारत आहे. असो, सत्ताधाऱ्यांकडून हीच अपेक्षा आहे, परंतु एका पत्रकाराला अशा प्रकारे मारहाण झाली असताना महाराष्ट्राच्या पत्रकारांनी साधा निषेध करण्याची हिंमत देखील केली नाही, हे मात्र नक्कीच अनपेक्षित आहे.”

An 08-year-old girl was raped and killed in Jalgaon district

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात एका 08 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणावरून युट्युब पत्रकार संदीप महाजन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना जाब विचारला होता.

यानंतर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना शिवीगाळ केलेली ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.

या ऑडिओ क्लिपमध्ये किशोर पाटील यांनी संदीप महाजन यांना हात-पाय तोडण्याची धमकी दिली असल्याचं ऐकू आलं होतं. त्यानंतर संदीप महाजन यांच्यावर हा हल्ला झाला आहे. त्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला किशोर पाटील यांनीच केला असल्याचं  बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

Rohit Pawar | टीम महाराष्ट्र देशा: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन (Sandeep Mahajan) यांना बेदम मारहाण करण्यात आली …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics