Share

Ambadas Danve | “…तर ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची हलू दिली नसती”; अंबादास दानवेंचं खळबळजनक विधान

🕒 1 min readAmbadas Danve | छत्रपती संभाजीनगर: काल (08 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या खासदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी ठाकरे गटावर टीका केली आहे. भाजपनं नाही तर शिवसेनेनं  युती तोडली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Ambadas Danve | छत्रपती संभाजीनगर: काल (08 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एनडीएच्या खासदारांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी ठाकरे गटावर टीका केली आहे.

भाजपनं नाही तर शिवसेनेनं  युती तोडली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर विधानपरिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे कुटुंब सत्तेसाठी हापापलेलं नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

The rulers know the importance of the Thackeray family – Ambadas Danve

अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले, “ठाकरे घराणं सत्तेसाठी हापापलेलं नाही. ते जर सत्तेसाठी हापापलेलं असतं तर त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची कधीच हलू दिली नसती.

2014 मध्ये दोन-तीन जागांसाठी मोठा वाद झाला होता. तेव्हा एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) फोन केला आणि आमच्यासोबत युती तोडली होती.

सत्ताधाऱ्यांना ठाकरे कुटुंबाचं महत्त्व माहित आहे. म्हणून ते त्यांचं नाव संपवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, “आम्ही शिवसेनेला सोडलं नाही तर शिवसेनेनं आमची साथ सोडली, असं जर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणत असतील तर ते जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

नरेंद्र मोदी यांनी 2014 मधील परिस्थिती आठवायला हवी. त्यावेळी शिवसेनेची साथ कुणी आणि का सोडली? हे अख्या देशानं बघितलं आहे.

एकनाथ खडसे यांनी अधिकृतपणे आम्हाला फोन करून याबाबत कळवलं होतं. आपण वेगळे झालो आहोत, आपली युती तुटली असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. शिवसेनेची साथ कोणी सोडली? यासंदर्भात त्यांना जुने रेकॉर्ड तपासण्याची अत्यंत गरज आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!