Chitra Wagh | थोडी तरी लाज बाळगा; चित्रा वाघांचा राहुल गांधींवर घणाघात

Chitra Wagh | टीम महाराष्ट्र देशा: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मणिपूर मुद्द्यावरून भाजप सरकारला धारेवर धरलं आहे.

भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामुळं मणिपूर उध्वस्त होत आहे. त्याचबरोबर भाजप सरकारनं मणिपूरमध्ये हिंदुस्तानची हत्या केली आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या या टीकेला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेस सरकारच्या पापांची यादी खूप मोठी असल्याचं चित्र वाघ यांनी म्हटलं आहे.

The list of sins of Congress governments is long – Chitra Wagh

चित्रा वाघ (Chitra Wagh ) यांनी ट्विट करत राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिलं आहे. ट्विट करत चित्रा वाघ म्हणाल्या, “राहुल गांधी हे सांगा..

1975 : आणीबाणी लागू झाली, मग भारतमातेची हत्या कोणी केली?

1984 : शीख दंगलीत निष्पाप लोक मारले गेले, मग भारत मातेची हत्या कोणी केली?

1990: गिरिजा टिक्कूचा गळा करवतीने कापला, मग भारत मातेची हत्या कोणी केली?

26/11: दहशतवादी हल्ला झाला, 164 लोक मारले गेले, मग भारत मातेची हत्या कोणी केली?

2012 : निर्भयावर अत्याचार करून हत्या करण्यात आली, मग भारत मातेची हत्या कोणी केली?

काँग्रेस सरकारांच्या पापांची यादी मोठी आहे. पण मग राहुल गांधी गप्प का होते? थोडी तरी लाज बाळगा!

दरम्यान, राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “भाजपच्या राजकारणामुळं माणिपूर उध्वस्त झालं आहे. भारत आपला आणि आपल्या जनतेचा आवाज आहे.

त्या आवाजाची भाजप सरकारनं मणिपूरमध्ये हत्या केली आहे. त्याचबरोबर या सरकारनं मणिपूरमध्ये भारत मातेची देखील हत्या केली आहे.

जोपर्यंत मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईची हत्या करत आहात, मी असचं समजणार आहे. भारतीय सैन्य एका दिवसात मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. मात्र, मोदी सरकार या गोष्टी करायला तयार नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.