Narendra Modi | शरद पवारांना काँग्रेसमुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही – नरेंद्र मोदी

Narendra Modi | टीम महाराष्ट्र देशा: काही दिवसांपूर्वी लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) एकाच व्यासपीठावर दिसून आले होते.

या घटनेनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या होत्या. अशात पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

शरद पवारांना काँग्रेसमुळं पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं असल्याचं सूत्रांनी ‘इंडिया टुडे’ला सांगितलं आहे. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

There is dynastic politics in Congress – Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची संवाद साधला आहे. यावेळी बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले, “काँग्रेसमध्ये घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे. त्यामुळं शरद पवार यांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही.

घराणेशाहीमुळं काँग्रेसनं अनेक नेत्यांनं राजकीय क्षमता असून देखील डावरलं आहे. भारतीय जनता पक्ष काँग्रेससारखा अहंकारी नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये आपलाच विजय होईल.”

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल पुण्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पुणे शहरातून एका अज्ञात व्यक्तींनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची माहिती मिळाली आहे.

पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकामध्ये या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी देशामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करणार आहे.

त्याचबरोबर मी देशातील हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करणार आहे. आय विल किल यू, अशा शब्दात त्या अज्ञात व्यक्तीनं पंतप्रधानांना जीवे-मारण्याची धमकी दिली आहे.

mokheem1508@gmail.com या ई-मेल आयडी वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना धमकी मिळाली आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.