Narendra Modi | पुणे: गेल्या काही दिवसांपासून विरोधकांनी मणिपूर मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच धारेवर धरलं आहे. अशात पुण्यामधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.
पुणे शहरातून एका अज्ञात व्यक्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेलद्वारे जीवे मारण्याची दिली असल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर अलंकार पोलीस स्थानकामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या माहितीनंतर राज्यासह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Threatened to kill Prime Minister Narendra Modi through e-mail
समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका अज्ञात व्यक्तीनं ई-मेलद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
मी देशामध्ये सिरीयस बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्या अज्ञात व्यक्तीनं म्हटलं आहे. त्याचबरोबर मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करणार असल्याचं देखील त्यांनी या ई-मेलमध्ये म्हटलं आहे. आय विल किल यू नरेंद्र मोदी अशा शब्दात त्याने पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
दरम्यान, mokheem1508@gmail.com या ई-मेल आयडी वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना धमकी मिळाली आहे. पुण्यातील अलंकार पोलीस स्थानकात या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी या प्रकरणावर चौकशी करायला सुरुवात केली आहे. या माहितीनंतर सर्वत्र खळबळ उडालेली असून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Sambhaji Bhide | होय! मीच यशोमती ठाकूर यांना धमकी दिली; संभाजी भिडेंच्या समर्थकाचा मोठा खुलासा
- Sanjay Raut | “… म्हणून मी नरेंद्र मोदींचे आभार मानतो…”; संजय राऊतांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत
- Uddhav Thackeray | “जनतेच्या प्रश्नावर नेहमीप्रमाणे मौनीबाबा…”; ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका
- Bacchu Kadu | झुकेगा नही साला; सरकार विरोधात बच्चू कडूंचा मोर्चा
- Ashish Shelar | “तुम्ही छत्रपती संभाजी नगरचे असल्यामुळे…”; आशिष शेलारांची अंबादास दानवेंवर खोचक टीका