Sambhaji Bhide | होय! मीच यशोमती ठाकूर यांना धमकी दिली; संभाजी भिडेंच्या समर्थकाचा मोठा खुलासा

Sambhaji Bhide | टीम महाराष्ट्र देशा: शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख संभाजी भिडे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.

त्यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्ष आक्रमक झाला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी भिडे यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं होतं.

यानंतर यशोमती ठाकूर यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. कैलास सूर्यवंशी (Kailas Suryavanshi) या व्यक्तीनं यशोमती ठाकूर यांना ही धमकी दिली होती.

In a fit of anger, I threatened Yashomati Thakur – Kailas Suryavanshi

यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्या कैलास सूर्यवंशी यांच्या विरोधात अमरावतीच्या गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मंगळवारी सकाळी पोलिसांनी कैलास सूर्यवंशी यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा कट्टर समर्थक असल्यामुळं रागाच्या भरात यशोमती ठाकूर यांना धमकी दिली असल्याचं कैलास सूर्यवंशी यांनी पोलिसांना सांगितलं आहे. चौकशीनंतर सूर्यवंशी यांना एसपी कार्यालयातून जामिनीवर सोडवून देण्यात आलं आहे.

दरम्यान, अमरावतीमध्ये बोलत असताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

“महात्मा गांधीजींचे वडील म्हणजेच करमचंद गांधी एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. करमचंद गांधी एक दिवस त्या मुस्लिम जमीनदाराची मोठी रक्कम घेऊन पळून गेले.

त्यानंतर चिडलेल्या जमीनदारानं त्यांच्या पत्नीला म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणलं . त्यानंतर त्यांनी त्यांच्यासोबत पत्नीसारखा व्यवहार केला. म्हणून महात्मा गांधीजींचे खरे वडील करमचंद गांधी नसून ते मुस्लिम जमीनदार आहे”, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.