Supriya Sule | “9 वर्षात भाजपनं 9…”; सुप्रिया सुळेंचा मोदी सरकार हल्लाबोल

Supriya Sule | नवी दिल्ली: मणिपूरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून हिंसाचार घडत आहे. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) संसदेत बोलत नसल्यामुळं विरोधकांनी आज त्यासाठी अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे.

या मुद्द्यावर बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर शाब्दिक हल्लाबोल चढवला आहे. देशाच्या राजकारणाचा स्तर अत्यंत घसरला आहे. भाजपनं 09 वर्षांमध्ये 09 सरकार पाडले असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

We are the representatives of Indian citizens – Supriya Sule

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “आम्ही भारतीय नागरिकांचे प्रतिनिधि आहोत. त्यामुळे नागरिकांच्या भावना मांडण्यासाठी आम्ही इथे अविश्वास प्रस्ताव मांडला आहे.

मणिपूरची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात महिलांवर अत्याचार होताना दिसत आहेत.

त्या महिला कुणाच्यातरी आई आणि बहिणी होत्या. तरीही सरकार मणिपूरकडं लक्ष द्यायला तयार नाही. या अशा सरकारला तुम्ही पाठिंबा कसं काय देऊ शकतात? हा प्रश्न देशातील महिलांच्या सन्मानाचा आहे. यामध्ये सत्ताधारी आणि विरोधक असं काहीच नाहीये.”

पुढे बोलताना त्या (Supriya Sule) म्हणाल्या, “देशामध्ये राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत चालला आहे. देशात आणि राज्यात विकासाच्या नावानं बोंब आहे.

भाजपनं 09 वर्षात 09 सरकार पाडले आहेत. यामध्ये कर्नाटक, मणिपूर, उत्तराखंड, मेघालय, मध्य प्रदेश, गोवा, पुद्दुचेरी आणि दोन वेळा महाराष्ट्र यांचा समावेश आहे. मोदी सरकारनं आत्तापर्यंत एकही आश्वासन पूर्ण केलं नाही.”

“मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचं दिसून आलं आहे. कारण शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असल्याचं सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात आहे.

मात्र, प्रत्यक्षात असं काहीच घडत नाही. जर खरंच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं असेल तर सरकारनं ते सिद्ध करून दाखवावं”, असही त्या (Supriya Sule) यावेळी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.