Omicron | पुणे: कोरोना महामारीने (Covid-19) जगभरात थैमान घातले होते. या महामारीतून जग सावरत असताना पुन्हा एकदा नव्या धोक्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ब्रिटनमध्ये ओमीक्रॉनचा नवा व्हेरीयंट धुमाकूळ घालत आहे. तर पुणे शहरामध्ये मे महिन्यात या व्हेरीयंट एक रुग्ण आढळून आला होता. तेव्हाच त्याचे निदान करण्यात आले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.
A new variant of EG.5.1 i.e. Omicron was detected in the state in May
टाइम्स ऑफ इंडियासोबत बोलताना जीनोम सिक्वेन्सिंगचे महाराष्ट्राचे समन्वयक आणि बीजे मेडिकल कॉलेजचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेश कार्यकर्ते म्हणाले, “राज्यामध्ये मे महिन्यात EG.5.1 म्हणजेच ओमीक्रोनचा (Omicron) नवीन व्हेरियंट आढळून आला होता.
यानंतर राज्यामध्ये या व्हेरियंटचा प्रभाव दिसलेला नाही. मात्र, सध्या राज्यात XBB.1.16 आणि XBB.2.3 व्हेरियंट सक्रिय होताना दिसत आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांवर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. सध्या पुण्यामध्ये 34 सक्रिय कोविड-19 रुग्ण आहे, तर मुंबईमध्ये ही रुग्णसंख्या 43 वर आहे.”
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात जुलैच्या अखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 70 वर होती. 06 ऑगस्टपर्यंत ही संख्या 115 वर जाऊन पोहोचली आहे.
सोमवारी (07 ऑगस्ट) राज्यामध्ये सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 109 एवढी होती. गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोविड रुग्ण संख्येमध्ये वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दरम्यान, कोरोना महामारी आणि नवीन व्हेरिएंट (Omicron) पासून सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
यासाठी घराबाहेर पडताना मास्क लावूनच बाहेर पडा. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. सर्दी, खोकला, ताप इत्यादी लक्षण असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
- Best Bus Strike | अखेर बेस्ट सेवेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संप घेतला मागे
- Sanjay Raut | “… तर मी खासदारकी सोडेल”; संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा उतरले मैदानात; ठाकरे गटावर केला 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- Ashish Shelar | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? ठाकरे गटाच्या प्रश्नाचं आशिष शेलारांनी दिलं उत्तर
- Sanjay Raut | “भाजपनं मतदानासाठी माणसं विकत घेतली..”; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात