Sanjay Raut | नवी दिल्ली: काल (07 ऑगस्ट) दिल्ली विधेयकावरून राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि खासदार संजय राऊत यांच्यात चांगलं शाब्दिक युद्ध रंगलं होतं.
या प्रकरणावरून संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली होती. संजय राऊत यांच्या टीकेला अमित शाह यांनी उत्तर दिलं होतं.
त्यानंतर संजय राऊतांचा माईक बंद करण्याचे आदेश देण्यात आले. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Amit Shah should be disqualified – Sanjay Raut
प्रसार माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “मला नक्की काय म्हणायचं होतं, हे अमित शाह यांनी समजून घेतलेलं नाही. अमित शाह यांनी माझ्या तोंडी खोटी वाक्य घातली, मी एवढेच म्हणालो होतो.
अमित शाहांवर हक्कभंग आणला पाहिजे. माझ्या तोंडी जर खरंच असं एखादं वाक्य असेल तर मी खासदारकी सोडायला तयार आहे. ते आमच्या तोंडी काहीही घालतात आणि स्वतःची टिमकी वाजवतात.
पुढे बोलताना ते (Sanjay Raut) म्हणाले, “महान लोकशाहीवादी देश म्हणून एक हिंदुस्थानची परंपरा आहे. आपल्या देशात लोकशाही आहे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव होतो.
तुम्ही त्या लोकशाहीला परंपरेला काळीमा फासतात, असं मी म्हणालो होतो. मात्र त्यांनी त्यांच्या सोयीनं विरोधकांच्या तोंडी वाक्य घातली आहे. मला यावर पॉईंट ऑफ ऑर्डर घ्यायचा होता. मात्र, मला तो घेऊ दिला नाही. कारण अमित शाह खोटं बोलत होते.”
“सध्या सुरू असलेल्या लढाईमध्ये आमचा प्रत्येक योद्धा हजर आहे. मतदानासाठी भाजपनं माणसं विकत घेतली असतील. मात्र, अद्याप आमच्यावरती वेळ आलेली नाही.
कारण ही लढाई लढण्यासाठी आमचा प्रत्येक योद्धा सक्षम आहे. आमच्यात भीष्मपितांपासून ते अभिमन्यूपर्यंत सर्व लढले आहे. त्यांनी आमच्या संजय सिंगचा अभिमन्यू केला होता, परंतु तरीही आम्ही लढत राहिलो”, असही ते (Sanjay Raut) यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya | किरीट सोमय्या पुन्हा एकदा उतरले मैदानात; ठाकरे गटावर केला 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- Ashish Shelar | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय? ठाकरे गटाच्या प्रश्नाचं आशिष शेलारांनी दिलं उत्तर
- Sanjay Raut | “भाजपनं मतदानासाठी माणसं विकत घेतली..”; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
- Uddhav Thackeray | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Narendra Modi | नरेंद्र मोदींसोबत आज महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची बैठक