Ashish Shelar | टीम महाराष्ट्र देशा: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) दोन दिवसापूर्वी पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तोंडभरून त्यांचं कौतुक केलं होतं.
अमित शाह यांना महाराष्ट्र कळतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावरूनच ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे.
अमित शाह यांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय? असं ठाकरे गटानं म्हटलं आहे. ठाकरे गटाच्या या प्रश्नाचं उत्तर आशिष शेलार यांनी दिलं आहे.
What does it mean that Amitbhai Shah knows Maharashtra?
ट्विट करत आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले, “मा. अमितभाई शाह यांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय ?
प्रभादेवीच्या गल्लीतील “पत्रकार पोपटलाल” आता ऐकाच!
■२०१६-१७ च्या पूर्वीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या रक्कमेला खर्च म्हणून मान्यता दिली. त्यामुळे सुमारे १०,००० कोटी रुपयांचा दिलासा देशातील साखर कारखान्यांना मिळाला.
■एफआरपीपेक्षा जास्त भाव दिला म्हणून त्या फरकावरील रकमेवर लागू केलेला साडे नऊ हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर केंद्र सरकारनं रद्द केला.
■एस डी एफ म्हणजे साखर विकास निधी अंतर्गत घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन होणार
■कारखाना कोलमडला तर शेतकरी कोलमडेल, शेतकरी कोलमडला तर ग्रामीण महाराष्ट्र कोलमडेल… असा महाराष्ट्र मा. अमितभाई शाह यांना कळतो.
■केंद्रीय राखीव पोलीस दलात भरतीची परीक्षा मराठीत घेण्याचा निर्णय अमितभाई शाह यांनी घेतला, असा महाराष्ट्र त्यांना कळतो.
●●अहो, पत्रकार पोपटलाल!
■छत्रपती शिवाजी महाराज, महामानव भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
या महाराष्ट्राच्या महान सुपुत्रांचा इतिहास, बलिदान, योगदान हे मा. अमितभाई शाह यांना कळते ते महान सुपुत्रांच्या चरणी नतमस्तक होतात, असा महाराष्ट्र त्यांना कळतो.
■ भारतरत्न लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी यांचे योगदान नक्षत्रांचे देणे आहे, हे अमितभाईंना कळते आणि असा महाराष्ट्र त्यांना कळतो!
■ आणि हो पोपटलाल बीसीसीआयचे ऑफिस अजूनही मुंबईतच आहे तर मुंबईचा रोहित शर्मा कॅप्टन झाला, अजिंक्य रहाणे व्हाईस कॅप्टन झाला मुंबईचा अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष झाला, असा कळतो त्यांना महाराष्ट्र..
ही काही वानगीदाखल उदाहरणे.
■ मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्यांच्यावर गोळ्या झाडणार्या, हुतात्म्यांचे हात रक्ताने माखलेल्या काँग्रेससोबत तुम्ही सत्तेत बसलात, तुम्हाला मुंबईवर बोलण्याचा अधिकार काय?
तरीही, कुठे भेटायचे ते ठरवा, सविस्तर समजून घ्यायचे तर आम्ही तयार..
प्रभादेवीच्या गल्लीतील पत्रकार पोपटलाल!!
मा. अमितभाई शाह यांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय ?
प्रभादेवीच्या गल्लीतील "पत्रकार पोपटलाल" आता ऐकाच!■२०१६-१७ च्या पूर्वीच्या काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलेल्या रक्कमेला खर्च म्हणून मान्यता दिली. त्यामुळे सुमारे १०,००० कोटी रुपयांचा दिलासा देशातील साखर कारखान्यांना मिळाला.…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 8, 2023
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “भाजपनं मतदानासाठी माणसं विकत घेतली..”; संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
- Uddhav Thackeray | अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे नक्की काय? ठाकरे गटाचा खडा सवाल
- Narendra Modi | नरेंद्र मोदींसोबत आज महाराष्ट्रातील NDA च्या खासदारांची बैठक
- Prakash Ambedkar | अजित पवार गेल्यावर शरद पवारांकडं काय राहिलं? – प्रकाश आंबेडकर
- Ashish Shelar | “गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत…”; आशिष शेलारांनी ठाकरे गटाचे कान टोचले